CM Basavaraj Bommai Dainik Gomantak
देश

ऑक्टोबरपासून कर्नाटकातील चित्रपटगृहे होणार सुरू

कोरोना (Covid 19 )रुग्णांना दर 2 टक्क्यांपेक्षा जास्त झाला तर सिनेमागृहे (Theaters), मंदिर(Temple), पब(Pub) बंद करण्यात येतील. असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

कर्नाटक: राज्यातील कोरोनाचा (Covid 19)संसर्ग कमी झाल्याने काही नियमांमध्ये थोडा बदल केला आहे. 1 % हुन पॉसिटीव्हिटीचा दर कमी झाल्याने जिल्ह्यातील सर्व चित्रपटगृहे (Theaters) 100 टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. परंतु पहिली ते पाचवी या वर्गांबाबत मात्र शाळा सुरु करण्यासाठी अद्याप कोणताच निर्णय घेतला नाही.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai)यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत सिनेमागृहे, मंदिर, शाळा आणि पब याच्या संदर्भात महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

या मध्ये ज्या जिल्ह्यांत पॉसिटीव्हिटीचा दर 1 टक्क्यापेक्षा कमी आहे त्या भागात 100 टक्के क्षमतेने सिनेमागृहे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

बैठकीतील ठळक मुद्दे :

  • थिएटर आणि पब मध्ये गर्भवती महिलांना प्रवेश नाही.

  • मंदिरांतील विशेष पूजा आणि सेवा याचा निर्णय त्या त्या भागातील जिल्हाधिकारी घेतील

  • सोमवार ते शुक्रवारपर्यंतच 6 वी ते 12 वीच्या विध्यार्थींची 100 टक्के उपस्थिती राहील.

  • 1 ली ते 5 वी चे वर्ग अद्याप तरी सुरू न करण्याचा निर्णय

  • रात्री 9 ऐवजी रात्री 10 ते सकाळी 5 पर्यंत कर्फ्यू

  • पब 3 ऑक्टोबर खुले करणात येतील

  • कर्मचाऱ्यांचे लसीकरण गोणे बंधनकारक

  • आरटीपीसीआर चाचणी सर्वासाठी बंधनकारक राहील.

कर्नाटकातील 6 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा, महाविद्यालये 100 % क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. नाईट कर्फ्यू रात्री 9 ऐवजी 10 पासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत राहणार आहे. आणि मंदिरांमधील

विशेष पूजा व सेवा करण्यासंबंधात परवानगी देण्याचा त्या भागातील परिस्थितीनुसार जिल्हाधिकारी (Collector)निर्णय घेतील. असे या बैठकीत मजूर केले आहेत. 3 ऑक्टोबरपासून सर्व पब सूर होतील. मात्र कोरोना रुग्णांना दर 2 टक्क्यांपेक्षा जास्त झाला तर सिनेमागृहे , मंदिर, पब बंद करण्यात येतील. असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: दाबोळी विमानतळाच्या अस्तित्वावर घाला घालण्याचं 'बनावट' कारस्थान! खासदार फर्नांडिस कडाडले, "ते माझं ट्विट नाही, हा भाजपचा डाव"

Pakistan Blast: पाकिस्तान हादरलं! कराचीत भीषण स्फोटात 16 जणांचा मृत्यू, मृतकांमध्ये 9 मुलांचाही समावेश Watch Video

"Indian Dog Go Back" ओरडत 22 वर्षीय शीख तरुणावर जीवघेणा हल्ला; ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषी नराधमांचा नंगा नाच

आघाडीपटू नेमिल याच्या खांद्यावर आक्रमणाची धुरा, FC GOAचे प्रशिक्षक मार्केझ नवोदितावर खूश

Shani Gochar 2026: नोकरीत प्रमोशन, व्यवसायात अमाप नफा अन् शत्रूंची उडणार दाणादाण; 'या' 3 राशींवर शनिदेवाची कृपा

SCROLL FOR NEXT