China, Pakistan Dainik Gomantak
देश

चीन-पाकिस्तानला रोखण्यासाठी भारताचे Heron Mark 2 देणार पहारा

Heron Mark 2: कोणत्याही ऋतुत हे ड्रोन 36 तास सलग काम करु शकणार आहे.

दैनिक गोमन्तक

Heron Mark 2 Drone: पाकिस्तान आणि चीनपासून आपले संरक्षण करण्यासाठी भारताने आता मोठे पाऊल उचलले आहे. भारत- पाकिस्तान आणि भारत-चीन सीमांवर लक्ष ठेवण्यासाठी हेरॉन मार्क-2 ड्रोन तैनात केले आहे. या ड्रोनचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच उड्डाणात हे ड्रोन पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांच्या सीमेवर लक्ष ठेऊ शकणार आहे.

मेक इन इंडिया अंतर्गत भारतीय वायुसेना प्रोजक्ट चीताला प्रोत्साहन देताना दिसून येत आहे. या अंतर्गत, भारतीय सशस्त्र दलाचे सुमारे 70 हेरॉन ड्रोन उपग्रह संप्रेषण लिंकसह अपग्रेड केले जाणार आहेत. लष्कराला 31 प्रीडेटर ड्रोन देखील मिळत आहेत.

चार नवीन हेरॉन मार्क-2 ड्रोन लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्र प्रणालींनी सुसज्ज आहेत. ते उत्तरेकडील सेक्टरमधील फॉरवर्ड एअर बेसवर तैनात आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, हेरॉन मार्क-2 ड्रोनचे संचालन करणाऱ्या स्क्वाड्रनला वार्डन ऑफ नॉर्थ म्हणून ओळखले जाते. आता हे ड्रोन चीन आणि पाकिस्तानच्या लागून असलेल्या सीमांवर लक्ष ठेवणार आहे. महत्वाचे म्हणजे कोणत्याही ऋतुत हे ड्रोन 36 तास सलग काम करु शकणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT