India China LAC Issue  Dainik Gomantak
देश

China Helipad at LAC: ड्रॅगनने पुन्हा काढली भारताची कुरापत; एलएसीवर बांधले हेलिपॅड

Akshay Nirmale

China Helipad At LAC: भारत आणि चीन यांच्या दरम्यान असलेल्या लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल (LAC - प्रत्यक्ष ताबा रेषा) वर आता चीनने हेलिपॅड बांधल्याचे समोर आले आहे. अमेरिकेचा संरक्षण विभाग पेंटॅगॉनच्या अहवालातून ही माहिती उघड झाली आहे.

शिवाय चीन एलएसीच्या आसपास रस्त्यांचे जाळे विस्तारत चालला असल्याचेही या अहवाला म्हटले आहे.

पेंटॅगॉनच्या अहवालात म्हटले आहे की, चीनने 2022 मध्ये LAC जवळ बरीच बांधकामे केली आहेत. भारतासोबतच्या वाढत्या तणावादरम्यान, चीनने नवीन रस्ते, बंकर, पॅंगॉन्ग तलावावर दुसरा पूल आणि एलएसीजवळ दुहेरी-उद्देशीय विमानतळ आणि अनेक हेलिपॅड बांधले आहेत.

चीनने डोकलामजवळ भूमिगत साठवण सुविधा, एलएसीच्या तीनही सेक्टरमधील नवीन रस्ते, भूतानमधील वादग्रस्त भागात नवीन गावे वसवली आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून पूर्व लडाखमधील अनेक केंद्रांवर भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष कमी करण्यासाठी, दोन्ही बाजूंनी विस्तृत राजनैतिक आणि लष्करी चर्चेनंतर अनेक भागातून सैन्य मागे घेतले.

या सगळ्यामध्ये पेंटागॉनने 'मिलिट्री अँड सिक्युरिटी डेव्हलपमेंट्स इन्व्हॉल्व्हिंग द पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना' नावाचा हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

दोन्ही देशातील वास्तविक नियंत्रण रेषेवरील सीमांकनाबाबत असलेल्या भिन्न धारणांमुळे येथे अनेक चकमकी झाल्या. 2022 मध्ये चीनने LAC वर लष्करी पायाभूत सुविधांचा विकास करणे सुरूच ठेवले आहे.

चीनने 2022 मध्ये एक सीमा रेजिमेंट तैनात केली होती आणि त्याला मदत करण्यासाठी शिनजियांग आणि तिबेट मिलिटरी डिस्ट्रिक्टच्या दोन तुकड्याही तैनात केल्या होत्या. यासह, चार संयुक्त सशस्त्र ब्रिगेड्स देखील पश्चिम सेक्टरमध्ये LAC वर तैनात केल्या आहेत.

तर तीन संयुक्त शस्त्रास्त्र ब्रिगेड (CAB) पूर्व सेक्टरमध्ये आणि तीन ब्रिगेड मध्य सेक्टरमध्ये तैनात केल्या आहेत. LAC वरून काही ब्रिगेड्स मागे घेतल्या असल्या तरी, बहुतांश सैनिक अजूनही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ तैनात आहेत.

जून 2020 मध्ये, गलवान व्हॅलीमध्ये चिनी सैनिक आणि भारतीय गस्ती पथक यांच्यात भीषण चकमक झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT