General Bipin Rawat
General Bipin Rawat Dainik Gomantak
देश

'चीन भारतासाठी सर्वात मोठा धोका': सीडीएस बिपिन रावत

दैनिक गोमन्तक

भारत-चीन (Indo-China) यांच्यात मागील काही महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये (East Ladakh) तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर हा तणाव शमविण्यासाठी लष्करी आणि राजकीय स्तरावर अनेक चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या. मात्र अद्याप कोणताच तोडगा निघू शकलेला नाही. चीन भारताला व्यापारी, लष्करी, आर्थिक स्तरावर घेरण्याचा प्रयत्न करत आहे. याच पाश्वभूमीवर आता चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत (General Bipin Rawat) यांनी म्हटले आहे की, भारताच्या सुरक्षेसाठी चीन हा सर्वात मोठा धोका आहे. गेल्या वर्षी सीमेचे रक्षण करण्यासाठी पाठवलेले हजारो सैनिक आणि शस्त्रे बेसकॅम्पवर परतलेले नसल्याचे, त्यांनी एका मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये सांगितले. सीडीएसने गुरुवारी सांगितले की, दोन अण्वस्त्रधारी देशातील (Indo-China) सीमा विवाद वाढत्या असणाऱ्या 'शंका' मुळे सोडवला जाऊ शकत नाही. गेल्या महिन्यात, भारत आणि चिनी लष्करी कमांडर्समधील चर्चेची 13 वी फेरी ठप्प झाली कारण दोन्ही बाजूंनी सीमेवरुन कशापध्दतीने सैन्य माघार घ्यावे यावर एकमत होऊ शकले नाही.

त्याच वेळी, गेल्या वर्षी चार दशकांतील भारत आणि चिनी सैनिकांमधील सर्वात हिंसक चकमकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे लक्ष शत्रू देश पाकिस्तानकडून चीनकडे (India China Relations) वळले आहे. गेल्या वर्षी सीमेवर झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते. तर चार चिनी सैनिक मारले गेले. मात्र चीनने आपल्या सैनिकांच्या मृत्यूची बाब लपवून ठेवली असून, आजपर्यंत खऱ्या आकड्याबाबत माहिती दिली नसल्याचेही म्हटले आहे.

दोन्ही देश सैन्य आणि शस्त्रे वाढवत आहेत

रावत म्हणाले की, लडाखमध्ये एलएसीवरील संघर्षानंतर भारत आणि चीन सीमेवर वेगाने सैन्य, शस्त्रे आणि पायाभूत सुविधा वाढवत आहेत. ते पुढे म्हणाले की, भारत सीमेवर आणि समुद्रात कोणत्याही गैरप्रकाराला तोंड देण्यासाठी तयार आहे. सीडीएसने अशा वेळी हे सांगितले आहे, जेव्हा परराष्ट्र मंत्रालयाने विवादित क्षेत्रावरील चिनी बांधकामांवर टीका केली आहे. रावत म्हणाले, 'चिनी नागरीक बहुधा एलसी जवळील गावात स्थायिक होत आहेत. जेथे भविष्यात त्यांचा लष्करी तळ निर्माण करु शकतात. दोन्ही देशांमधील तणावानंतर चीनने हे पाऊल उचलले आहे.

अफगाणिस्तानबाबत चिंता व्यक्त केली

सीडीएस जनरल बिपिन रावत यांनीही अफगाणिस्तानच्या (Afghanistan) मुद्द्यावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, तालिबान (Taliban) राजवटीचा भारताच्या सुरक्षेवर परिणाम होईल, जम्मू-काश्मीरच्या अशांत उत्तरेकडील भागात दहशतवाद्यांना अफगाणिस्तानकडून दारुगोळा मदत मिळण्याची शक्यता वाढते. भारताच्या लष्करी नेतृत्वाला चिंता आहे की, दहशतवादी गट पुन्हा सत्तेवर आल्याने या प्रदेशात कार्यरत दहशतवादी गटांना मदत होऊ शकते. त्यामुळे सीमा सुरक्षा मजबूत केली गेली आहे. ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानशी संबंधित शत्रुत्ववादी तालिबान आणि चीनच्या सुरक्षेच्या मुद्द्यांमुळे भारतीय लष्कराला उत्तर आणि पश्चिम सीमेवर थिएटर कमांडची पुनर्रचना करणे आवश्यक झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News : लोकसभा निवडणूक २०२४; मगोपची सावईवेरे येथे प्रचार सभा

Kolem News :कुळे, बेळगावहून येणाऱ्या चालत्या ट्रकला आग, ३२ लाखांचे नुकसान

Pakistan Road Accident: पाकिस्तानात भीषण अपघातात, 20 ठार 15 जखमी; बचावकार्य सुरु

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

SCROLL FOR NEXT