Vaccination Dainik Gomantak
देश

Vaccination: 2 ते 12 वयोगटातील मुलांना यंदा लस मिळणार नाही

देशातील लहान मुलांना लस देण्यासाठी संपूर्ण तयारी केली आहे. 18 वर्षांपर्यंतच्या किशोरवयीन मुलांना लस देण्यासाठी चाचण्या करण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

लहान मुलांसाठी यावर्षी कोरोनाची (Covid-19) लस (Vaccine) उपलब्ध होवू शकणार नाही. कोविड टास्क फोर्सच्या (Covid Task Force) संशोधन पथकाच्या मते, कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान मुलांवर केलेल्या संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, 2 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना सध्या कोरोनाचा धोका नाही. म्हणूनच 2022 च्या पहिल्या तिमाहीत या वयातील मुलांना लसीकरण (Vaccination) करावे असे ठरवले गेले आहे. संशोधन पथकाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडेही याची शिफारस केली आहे. (Children between ages of 2 and 12 will not be vaccinated this year)

देशातील लहान मुलांना लस देण्यासाठी संपूर्ण तयारी केली आहे. 18 वर्षांपर्यंतच्या किशोरवयीन मुलांना लस देण्यासाठी चाचण्या करण्यात आल्या आहेत. परंतु या दरम्यान, आयसीएमआरची लसीकरण संशोधन टीम आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय कोविड टास्क फोर्स टीमच्या काही वेगळ्या शिफारसी आहेत.

या टिमचे अध्यक्ष डॉ.एन.के. अरोरा म्हणतात की, लहान मुलांना या वर्षी लस दिली जाणार नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार पुढील वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान मुलांना लस देण्याचा पूर्ण प्रस्ताव मांडण्यात आला आहे. याचे कारण स्पष्ट करताना ते पुढे म्हणाले की, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, मुलांना त्यांच्या कोरोनाचा तेवढा धोका नाही. जेवढा त्यांचा पालकांना आहे. भारत सरकार डिसेंबरच्या अखेरीस देशातील सर्व लक्ष्यित गटांचे लसीकरण करण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करीत आहे.

डॉक्टर अरोरा यांच्या म्हणण्यानुसार, 2 ते १२ वयोगटातील मुलांनी डिसेंबरनंतर पहिल्या तीन महिन्यांत लसीकरण केले पाहिजे अशी शिफारस करण्यात आली आहे. म्हणून, कोणतीही अत्यंत आणीबाणी नसल्यास, 2022 च्या जानेवारी ते मार्च दरम्यान 2 ते 12 आणि 13 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू केले जाईल. जोपर्यंत मुलांना पूर्ण लसीकरण होत नाही तोपर्यंत शाळा उघडल्या जाणार नाहीत. संसदीय समितीने दिलेल्या शिफारशींमध्ये त्यांच्या तज्ज्ञांच्या टीमचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

देशातील लसीकरणाच्या संपूर्ण व्यवस्थेवर देखरेख करणाऱ्या समितीचे अध्यक्ष डॉ एन.के. अरोरा म्हणतात की, सध्या भारतासह जगातील विविध देशांमध्ये तयार केलेली लस लागू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाचा संपूर्ण प्रयत्न हा आहे की प्रत्येकाने डिसेंबर अखेरपर्यंत लस घ्यावी. त्यानंतर, दोन वर्षांपासून ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी लसीकरण मोहीम सुरू केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

India vs Pakistan: पाकड्यांचा पराभव अटळ! हेड-टू-हेड आकडेवारीत टीम इंडियाचा वरचष्मा, सूर्याची 'ब्लू आर्मी' करणार कमाल

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला दिवसाढवळ्या लुबाडले, लंपास केली सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

SCROLL FOR NEXT