CJI U U Lalit Dainik Gomantak
देश

CJI U U Lalit: 74 दिवसांत तब्बल 10 हजार प्रकरणे निकाली; सरन्यायाधीश लळित यांच्या कामाचा धडाका

13 हजार प्रकरणे फेटाळली; नवे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड उद्या घेणार शपथ

गोमन्तक डिजिटल टीम

CJI Lalit: भारताचे सरन्यायाधीश यु. यु. लळित हे आज, मंगळवारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना सरन्यायाधीशपदी एकुण 74 दिवसांचा कार्यकाळ लाभला. या काळात त्यांनी 10 हजार हून अधिक खटले निकाली काढले आहेत. तर ज्या केसेसमध्ये मेरिट नव्हते, असे 13 हजार खटले त्यांनी फेटाळले आहेत.

सरन्यायाधीश लळित हे मंगळवारी निवृत्त होत आहेत. तर डी. वाय. चंद्रचूड हे उद्या, बुधवारी 9 नोव्हेंबर रोजी देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या एका कार्यक्रमात सरन्यायाधीश लळित म्हणाले की, या पदावर आल्यानंतर सहा संविधानिक पीठ बनवली. सर्व न्यायाधीशांना कोणत्या कोणत्या पीठात ठेवले. सर्व न्यायाधीशांशी चर्चा केली. कामे वाटून दिली. जेणेकरून प्रकरणांचा निपटारा लवकरात लवकर व्हावा. मी माझ्या कामांवर समाधानी आहे. जी आश्वासने दिली ती जवळपास पुर्ण केली आहेत.

सरन्यायाधीश यु. यु. लळित यांचे महत्वाचे निर्णय

1) लळित यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने 2002 च्या गुजरात दंगलीतील सर्व केसेस बंद करण्याचा निर्णय घेतला. सुप्रीम कोर्टाच्या तपास समितीला या केसेसमध्ये काहीही आढळून आलेले नाही, असे लळित यांनी म्हटले आहे.

2) दिल्लीत 2012 मध्ये घडलेल्या छावला गँगरेप प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा निर्णयही लळित यांच्या खंडपीठाने दिला. या प्रकरणात हायकोर्टाने 3 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती.

3) तिस्ता सेटलवाड यांना जामिन आणि युएपीए अंतर्गत अटकेत असलेल्या केरळचे पत्रकार कप्पन सिद्दिकी यांना जामिन देण्याचा निर्णयही त्यांनी घेतला.

4) याशिवाय सीएए, आर्टिकल-370 आणि युएपीए या कायद्यांवरील सुनावणी त्यांनी तत्काळ सुरू केल्या.

5) लळित यांच्या खंडपीठानेच EWS आरक्षणाचा निर्णय घेतला. यात 3 न्यायाधीश आरक्षणाच्या बाजुने होते तथापि, या खंडपीठात स्वतः लळित आणि न्या. रविंद्र भट्ट हे या आरक्षणाच्या विरोधात होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT