Chhattisgarh police seized goan made liquor  google image
देश

Chhattisgarh News: गोवा बनावटीची दीड लाखाची दारू सोडून चोरटे पसार; पोलिसांनी केली जप्त

छत्तीसगड पोलिसांची कारवाई

गोमंतक ऑनलाईन टीम

Chhattisgarh News: गोव्यातून स्वस्तःत आणलेला मद्याचा बेवास स्थितीतील साठा छत्तीसगड पोलिसांनी जप्त केला आहे. नवी रायपूर येथील खांडवा या गावाशेजारील रस्त्यावर हा साठा पोलिसांना आढळून आला. पोलिसांची चाहूल लागताच संशयित मद्य तस्करांनी हा साठा येथेच सोडून पळ काढल्याची चर्चा आहे.

हा गोवा बनावटीचा अवैध इंग्रजी मद्याचा साठा आता पोलिसांच्या ताब्यात आहे. दारूचे एकूण 20 बॉक्स असून त्यात मिळून 960 बाटल्या असल्याचे समजते. या साठ्याची एकूण किमित 1 लाख 50 हजार रूपये इतकी आहे. पोलिसांनी या प्रकरणी अबकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

मद्यप्रेमींसाठी गोवा हे स्वर्ग समजले जाते. कारण देशातील इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात मद्याचे दर खूप स्वस्त आहेत. त्यामुळे केवळ मद्यपानाच्या उद्देशाने गोव्याला येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाणही खूप आहे.

त्यातून अनेकदा गोव्यात मिळणारी ही स्वस्तःतली दारू आपल्या राज्यात नेण्याचा प्रयत्न केला जातो. चेकपोस्टवर पोलिसांनी ही दारू आढळून आल्यास ती जप्त केली जाते.

त्यामुळे गोव्यातून स्वस्तःत दारू विकत घेऊन तिची विविध राज्यात तस्करी करण्याचे अनेक प्रयत्न उघडकीस येत असतात. अशाच तस्करीतून ही दारू छत्तीसगडमध्ये नेल्याची चर्चा आहे. तथापि, आता हा साठा पोलिासंनी जप्त केला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tillari Canal Repair: तिळारी कालवा दुरुस्ती मार्चपासून; पर्यायी पाणीव्यवस्था अपूर्ण असल्याने काम लांबणीवर

Seva Sankalp Campaign: 'सरकार तुमच्या दारी'; मुख्यमंत्र्यांनी बार्देशातील 200 नागरिकांच्या समस्या ऐकल्या, अधिकाऱ्यांना तातडीच्या कारवाईचे आदेश

Viral Video: हातात काठी नाही, मनात भीती नाही! महिलांनी चक्क अजगराला दोरीने बांधलं अन् शेताबाहेर नेलं; थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

खरी कुजबुज: मुख्यमंत्र्यांना जनतेचा वेढा

VIDEO: 6 षटकार, 5 चौकार अन् 71 धावांची वादळी खेळी! युवराज सिंहने दाखवला जुन्या 'युवी'चा अंदाज, ऑस्ट्रेलियाला धू धू धुतलं

SCROLL FOR NEXT