Dantewada Naxal Attack: छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे बुधवारी झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 10 जवान आणि एका चालकासह 11 जण शहीद झाले आहेत. हे 10 जवान डीआरजीचे होते. याशिवाय एका चालकाचाही मृत्यू झाला आहे.
अरणपूरमध्ये नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.
या घटनेनंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, 'दोषींना सोडले जाणार नाही. नक्षलवाद्यांविरुद्धची आमची लढाई अंतिम टप्प्यात आहे. हे जवान गस्त घालून परतत होते, त्यानंतर नक्षलवाद्यांनी वाहनावर बॉम्ब हल्ला केला.'
दुसरीकडे, छत्तीसगडचे (Chhattisgarh) माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी बघेल यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, जेव्हा जेव्हा हल्ला होतो तेव्हा बघेल तेच बोलतात पण त्यांनी आजपर्यंत ठोस पाऊल उचलले नाही.
रमण सिंह पुढे म्हणाले की, जोपर्यंत नक्षलवाद्यांविरोधातील कारवाई राज्यांच्या समन्वयाने चालवली जात नाही, तोपर्यंत ही समस्या कायम राहणार आहे.
तसेच, या घटनेला दुजोरा देत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शोक व्यक्त केला आहे. दुसरीकडे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
बघेल म्हणाले की, हा लढा अंतिम टप्प्यात असून नक्षलवाद्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. नियोजनबद्ध पद्धतीने नक्षलवादाचा नायनाट केला जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांचा सामना करण्यासाठी अतिरिक्त फौजफाटा मागवण्यात आला आहे.
सरकारच्या 2021 च्या आकडेवारीनुसार, छत्तीसगडमध्ये 8 जिल्हे नक्षलग्रस्त आहेत. ही जिल्हे- दंतेवाडा, बस्तर, सुकमा, विजापूर, कांकेर, नारायणपूर, राजनांदगाव आणि कोंडागाव.
एप्रिल 2021 मध्ये गृह मंत्रालयाने लोकसभेत सांगितले होते की, 2011 ते 2020 या 10 वर्षांत छत्तीसगडमध्ये 3 हजार 722 नक्षलवादी हल्ले झाले, ज्यामध्ये 489 जवान शहीद झाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.