Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: पुराच्या पाण्यातून ट्रॅक्टर घेऊन जाण्याचा जीवघेणा स्टंट, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; नेटकरी व्यक्त करतायेत संताप

Chhattisgarh Flood Video: देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Manish Jadhav

Chhattisgarh Flood Video: देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. नद्या आणि नाल्यांना आलेल्या पुरामुळे रस्ते आणि पुलांवरुन पाण्याचा जोरदार प्रवाह वाहत आहे. अशा जीवघेण्या परिस्थितीतही काही लोक बेपर्वाईने स्वतःचा जीव धोक्यात घालताना दिसत आहेत. छत्तीसगडच्या (Chhattisgarh) जशपूर जिल्ह्यातून अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे लोक संताप व्यक्त करत आहेत.

आधी हा व्हिडिओ पाहा!

जीवावर उदार होऊन पुल पार करण्याचा प्रयत्न

दरम्यान, व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ जशपूर जिल्ह्यातील खरसोटा येथील लावा नदीवर असलेल्या अनिकेत धरणाचा आहे. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातून पाण्याचा प्रवाह वेगाने होत आहे. त्याचवेळी, व्हिडिओमध्ये एक ट्रॅक्टर चालक धरणावरील पुलावरुन आपला ट्रॅक्टर घेऊन जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, या पुलाला कठडे (रेलिंग) नसल्याने धोका आणखी वाढला आहे. व्हिडिओमध्ये चालक मोठ्या धैर्याने हळूहळू ट्रॅक्टर पुढे नेत असल्याचे दिसत आहे. मात्र पाण्याचा प्रवाह एवढा वेगवान आहे की, ट्रॅक्टर वाहून जाण्याची शक्यता दिसत आहे. मात्र, व्हिडिओच्या शेवटी तो चालक पुल पूर्णपणे पार करु शकला की नाही, हे स्पष्ट होत नाही.

सोशल मीडियावर लोकांचा संताप

दुसरीकडे, या जीवघेण्या स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेकांनी या चालकाच्या बेजबाबदारपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका यूजरने संताप व्यक्त करत लिहिले, "जर हा माणूस जिवंत असेल, तर त्याला मारहाण केल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर (Social Media) यायला हवा." दुसऱ्या एका यूजरने उपहासात्मक टिप्पणी केली, "हा स्वतःला हेवी ड्रायव्हर समजत आहे."

तसेच, अनेकांनी या घटनेला मूर्खपणाचे कृत्य म्हटले. कोणताही माणूस आपल्या जीवाला अशा प्रकारे धोक्यात का घालेल, असा प्रश्नही अनेकजण विचारत आहेत. काही यूजर्संनी हा व्हिडिओ एआय (AI) तंत्रज्ञानाने तयार केला असल्याचा संशयही व्यक्त केला आहे. मात्र, व्हिडिओची सत्यता अद्याप पूर्णपणे पडताळली गेलेली नाही. तरीही ही घटना लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देते. पुराच्या पाण्यातून प्रवास करणे किती धोकादायक असू शकते, हे हा व्हिडिओ दाखवून देतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील 'त्या' भीषण अपघातात अखिल भारतीय सॅपेक टॅकरो असोसिएशनचे अध्यक्ष आणि वरिष्ठ खेळाडुचा मृत्यू

Pakistan Supreme Court Blast: पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा धमाका! 12 जण गंभीर जखमी; स्फोटाचे नेमके कारण काय?

Yashasvi Jaiswal Century: दक्षिण आफ्रिकेची 'डोकेदुखी' वाढली! कसोटी मालिकेपूर्वी यशस्वी जयस्वालचा 'मास्टरस्ट्रोक', ठोकलं शानदार शतक

Horoscope: मालामाल व्हा! कार्तिक पौर्णिमेला राशीनुसार दान करा 'या' वस्तू; देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल

Goa Police: कायदा हातात घ्याल तर याद राखा; गोवा पोलिस महासंचालकांची क्लब मालकांना तंबी

SCROLL FOR NEXT