Chhattisgarh Crime News: नात्यातील विश्वासाला काळिमा फासणारी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातून समोर आली आहे. येथील एका 13 वर्षीय मुलावर त्याच्याच कथित मामाने चाकूने जीवघेणा हल्ला केला. आरोपीने मुलावर तब्बल 10 वेळा चाकूने वार केले आणि तो मेला असे समजून त्याला झुडुपांमध्ये फेकून पळ काढला. मात्र, प्रसंगावधान राखत या चिमुकल्याने दाखवलेली हिंमत त्याच्या आयुष्याची ढाल ठरली. सध्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही संपूर्ण घटना बिलासपूर जिल्ह्यातील मस्तुरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बटाही पुलाजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, लिमतरा गावात राहणारा 13 वर्षीय सूर्यांश बरगाह हा रविवारी (17 ऑगस्ट) दुपारी आपल्या घराबाहेर खेळत होता. त्याचवेळी, त्याचा कथित मामा त्याला भेटायला आला. त्याने सूर्यांशला चॉकलेट आणि बिस्किट देण्याचे आमिष दाखवले आणि त्याला आपल्यासोबत मोटारसायकलवर बसवून नेले. दोघांनीही रस्त्याने प्रवास सुरु केला आणि काही वेळाने ते बटाही पुलाजवळ पोहोचले. तिथे पोहोचताच आरोपी मामाचे क्रूर रुप समोर आले. त्याने भाच्याला बाईकवरुन खाली उतरवले आणि अचानक त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यास सुरुवात केली.
चाकूचे वार होताच सूर्यांश पूर्णपणे घाबरुन गेला. चाकूबंदीमुळे त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला आणि तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला. या जीवघेण्या हल्ल्यातून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सूर्यांशने मोठा धोका पत्करत मरण्याचे नाटक केले. तो निष्प्राण झाल्यासारखा पडून राहिला. त्याला मृत समजून आरोपी मामाने त्याला जवळच्या झुडुपांमध्ये फेकून दिले आणि आपली बाईक तिथेच सोडून घटनास्थळावरुन पळ काढला.
जवळपास 15 मिनिटे झुडुपांमध्ये पडून राहिल्यानंतर सूर्यांश मोठ्या हिंमतीने हळूहळू रस्त्याकडे आला. त्याने रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांकडे मदतीची याचना केली. त्यांनी तात्काळ ‘डायल 112’ या पोलीस हेल्पलाइनवर घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि सूर्यांशला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी जखमी मुलाला विचारपूस केली असता त्याने सांगितले की, 'मी मरण्याचे नाटक केले म्हणून माझा जीव वाचला, अन्यथा मामाने मला जिवंत सोडले नसते.'
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांना आरोपी मामाची बाईक तिथेच सापडली. पोलिसांनी ती जप्त केली असून, आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला लवकरच अटक केली जाईल. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.