Chhattisgarh Chief Minister Bhupesh Baghel
Chhattisgarh Chief Minister Bhupesh Baghel  Dainik Gomantak
देश

BJP-RSS ने भगवान रामाची प्रतिमा 'रॅम्बो' सारखी बनवली: मुख्यमंत्री भूपेश बघेल

दैनिक गोमन्तक

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी रविवारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार प्रहार केला. भगवान रामाची प्रतिमा रॅम्बोसारखी बनवल्याचा आरोप बघेल यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, भाजप-आरएसएसने हनुमानाला क्रोधाचे प्रतीक बनवले आहे. माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, भारत (India) "प्रक्षोभक आणि आक्रमक राष्ट्रवादाच्या" टप्प्यातून जात आहे. (Chhattisgarh Chief Minister Bhupesh Baghel criticized the BJP and the Rashtriya Swayamsevak Sangh)

“एप्रिलमध्ये, संपूर्ण भारतातून जातीय संघर्षाची नोंद झाली. इथे मतभेदाला जागा उरलेली नाही." ही वेळ निघून जाईल आणि काँग्रेस (Congress) परत सत्तेत येईल असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "महात्मा गांधींनीही (Mahatma Gandhi) रामाला पाहिले होते. त्यांचे शेवटचे शब्द 'हे राम' होते आणि ते रघुपती राघव राजा राम म्हणत असत. परंतु आज भाजप आणि आरएसएस प्रभु रामाला आक्रमक रुपात पाहत आहे. त्यांनी रामाला 'हे राम' बनवले आहे. हनुमान हे नम्रता, भक्ती आणि शहाणपणाचे प्रतीक आहे, परंतु आज त्यांचे आक्रमक पोस्टर्स भाजपकडून लावण्यात येत आहेत. त्याचबरोबर प्रभु रामाला आक्रमक रुपात दाखवण्याचाही प्रयत्न भाजप करत आहे."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Panaji News : भाजपने पक्षांतराबद्दल भूमिका स्पष्ट करावी; इंडिया आघाडीच्या प्रवक्त्यांची मागणी

Valpoi News : प्रलंबित खटल्यांमध्ये ‘मध्यस्थी’ उत्तम पर्याय : ॲड. सावईकर

Taleigao Election 2024 : ताळगावात सात अपक्षांचे आव्हान; प्रचाराची सांगता

Brazil Hotel Fire: ब्राझीलमधील 3 मजली हॉटेलला भीषण आग; 10 जणांचा मृत्यू तर 11 जण जखमी

Loksabha Election Voting : वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसाठी मतदानाची व्यवस्था करा; शॅडो कौन्सिलची मागणी

SCROLL FOR NEXT