Muslim Women Dainik Gomantak
देश

''बुरखा काढ, तुझा सुंदर चेहरा दिसत नाही...''; हेड कॉन्स्टेबलचे मुस्लिम महिलेशी असभ्य वर्तन

Muslim Woman: चेन्नईतील एका हेड कॉन्स्टेबलला मुस्लिम महिलेसोबत असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरुन निलंबित करण्यात आले आहे.

Manish Jadhav

Muslim Woman: चेन्नईतील एका हेड कॉन्स्टेबलला मुस्लिम महिलेसोबत असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरुन निलंबित करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, या पोलीस अधिकाऱ्याने महिलेला तिचा बुरखा काढण्यास सांगितले होते. 'तुझा सुंदर चेहरा दिसत नाही, त्यामुळे तू तुझा बुरखा काढ,' असे त्या हेड कॉन्स्टेबलने म्हटले होते. ही महिला पोलिस ठाण्यात गेली होती, तिथे तिच्याशी असे असभ्य वर्तन करण्यात आले. वास्तविक, महिलेची गाडी चोरीला गेली होती, ज्याबाबत तिने तक्रार दाखल केली होती. तिच्या तक्रारीबाबत तपासाची माहिती घेण्यासाठी ती पोलिस ठाण्यात गेली होती.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या महिलेची दुचाकी 14 फेब्रुवारी रोजी चोरीला गेली होती. याबाबत तिने एफआयआर दाखल केला होता. तिच्या या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करुन नंतर वाहन जप्त करण्यात आले. या प्रकरणी हेड कॉन्स्टेबलने फातिमाला तिची स्कूटर परत हवी असेल तर त्यासाठी कोर्टात जावे लागेल, असे सांगितले. हे ऐकून ती अस्वस्थ झाली आणि रडू लागली. यावर कॉन्स्टेबलने म्हटले की, 'तू रडतानाही खूप सुंदर दिसतेस. एक काम कर, तुझा बुरखा हटव, तुझा सुंदर चेहरा दिसत नाही.'

प्राथमिक तपासाच्या आधारे कारवाई केली

पोलीस अधिकाऱ्याच्या अशा गोष्टी ऐकून फातिमाला खूप वाईट वाटलं. याबाबत तिने हेड कॉन्स्टेबलविरुद्ध तक्रार दाखल केली. आता याप्रकरणीही पोलीस पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. प्राथमिक तपासाच्या आधारे आरोपी पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडिया यूजर्संनी या घटनेवर आश्चर्य व्यक्त केले असून पोलीस अधिकारी असे वागले तर सुधारणा कशी होणार असल्याचे म्हटले आहे. दोषी अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

SCROLL FOR NEXT