BJP
BJP 
देश

West Bengal Elections : भाजपच्या उमेदवारावर फेकला केमिकल रंग; पश्चिम बंगाल मधील घटना

दैनिक गोमन्तक

पश्चिम बंगालमध्ये हुगली मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार आणि चुंचुडा विधानसभा क्षेत्रासाठी भाजप पक्षाच्या उमेदवार लॉकेट चॅटर्जी यांच्या चेहऱ्यावर केमिकल मिश्रित रंग टाकल्याची घटना घडली आहे. रंग लॉकेट चॅटर्जी यांच्या डोळ्यात गेल्याने त्यांची तब्येत बिघडली असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर त्यांना आनन फानन येथील हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याचे समजते. भाजपच्या उमेदवार लॉकेट चॅटर्जी यांच्यावर केमिकल मिश्रीत रंग फेकल्याची घटना चुंचुडा येथील रवींद्र नगर परिसरातील वसंतोत्सवाच्या वेळेस घडली. (Chemical color was thrown at BJP candidate Locket Chatterjee)

भाजपच्या (BJP) उमेदवार लॉकेट चॅटर्जी यांच्यावर केमिकल मिश्रीत रंग फेकल्यानंतर भाजपने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात कोदालिया दोन ग्रामपंचायतीच्या प्रधान विद्युत विश्वास यांच्या नेतृत्वात अज्ञात लोकांनी लॉकेट चॅटर्जी यांच्यावर केमिकल मिक्स असलेला रंग टाकल्याचा आरोप केला आहे. तर, लॉकेट चॅटर्जी यांनी आपल्यावर केमिकल मिक्स असलेला रंग टाकण्यात आल्याचे सांगत, जेंव्हा आपण हा रंग कुणी फेकला हे पाहण्यासाठी वर पाहिले त्यावेळेस टीएमसीचे बॅजेस घातलेले 3-4 लोक उभे असल्याचे म्हटले आहे.     

दरम्यान, पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभेसाठी मतदानाचा पहिला टप्पा शनिवारी पार पडला. यावेळेस पश्चिम बंगाल मध्ये 79.79 आणि आसाम  72.14 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील 30 आणि आसाम मध्ये 47 जागांसाठी मतदान झाले. त्याकरिता दोन्ही राज्यात मिळून एकूण  21,825 मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. याशिवाय, पश्चिम बंगालमध्ये 10,288 (बॅटल युनिट आणि कंट्रोल युनिट) आणि त्याच संख्येने व्हीव्हीपॅट मशीन वापरण्यात आल्या. त्याच वेळी आसाममध्ये 11,537 ईव्हीएम आणि 37 व्हीव्हीपीएटी मशीन्स वापरली गेली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT