Kedarnath Dham Dainik Gomantak
देश

Chardham Yatra 2023: भाविकांच्या मृत्यूचा आकडा वाढला, केदारनाथ यात्रेदरम्यान आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू!

Kedarnath Dham: एकीकडे चारधाम यात्रेबाबत भाविकांमध्ये प्रचंड उत्साह असताना दुसरीकडे यात्रेदरम्यान मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे.

Manish Jadhav

Kedarnath Dham: एकीकडे चारधाम यात्रेबाबत भाविकांमध्ये प्रचंड उत्साह असताना दुसरीकडे यात्रेदरम्यान मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे.

यावर्षी केदारनाथ यात्रेदरम्यान आतापर्यंत 24 यात्रेकरुंचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये 6 महिला आणि 18 पुरुषांचा समावेश आहे.

केदारनाथ धामच्या दर्शनासाठी भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

लहानांपासून मोठ्या रुग्णालयांपर्यंत, केदारनाथ पायी मार्गापासून ते रस्त्यापर्यंत प्रत्येक 5 किलोमीटरवर छोटी केंद्रे उघडण्यात आली आहेत. जेणेकरुन प्रवाशांची तपासणी वेळेवर होऊन त्यांना लवकर उपचार मिळू शकतील.

दरम्यान, 23 दिवसांत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराचा झटका हे बहुतांश मृत्यूंचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.

अशा परिस्थितीत येथे प्रश्न उपस्थित होतो की, आरोग्य विभाग इतके दावे करत असताना केदारनाथपासून सोनप्रयाग, गौरीकुंडपर्यंत पॅरामेडिकल कर्मचारी आणि रुग्णालये (Hospital) उघडून सर्वत्र रुग्णांना उपचार दिले जात आहेत, मग इतके मृत्यू कसे होतायेत?

दुसरीकडे, मुख्य विकास अधिकारी नरेश कुमार सांगतात की, आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

सरकारने अ‍ॅडव्हायझरी जारी केली आहे

त्याचवेळी, राज्यातील बदलते हवामान आणि हृदयविकाराच्या झटक्याने भाविकांच्या सततच्या मृत्यूनंतर धामी सरकारने चारधाम यात्रेशी संबंधित अ‍ॅडव्हायझरी जारी केली आहे.

अॅडव्हायझरीनुसार, भाविकांना प्रवास सुरु करण्यापूर्वी त्यांची संपूर्ण तपासणी करुन घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

याचे मुख्य कारण म्हणजे मंदिर उंचावर आहे. मंदिर इतक्या उंचीवर आहे की, भाविकांना थंडी, कमी आर्द्रता आणि कमी ऑक्सिजनमुळे समस्यांना सामोरे जावे लागते, त्यामुळे जे पूर्णपणे निरोगी असतील त्यांनीच मंदिराला भेट द्यावी.

तसेच, भाविकांना चारधामला जाण्यापूर्वी दररोज 5-10 मिनिटे श्वासोच्छवासाचे व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासोबतच रोज 20-30 मिनिटे चालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रवासाला (Travel) येण्यापूर्वी हवामानाची माहिती घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT