Kedarnath Yatra Dainik Gomantak
देश

Kedarnath Yatra 2023: केदारनाथमध्ये बम बम भोलेचा गजर! उघडले गेले मंदिराचे दरवाजे, पाहा व्हिडिओ

केदारनाथ येथे भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळाली आहे.

Puja Bonkile

Kedarnath Yatra 2023: चारधाम यात्रा करणे हे देखील भारतीय संस्कृतीत पवित्र मानले जाते. चारधामपैकी एक असलेले केदारनाथ येथील यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. आज सकाळी 6:20 वाजता भाविकांसाठी केदारनाथचे कवाडं उघडण्यात आले.

आज सकाळी गोठवण्याऱ्या थंडीत तब्बल सात हजार भाविकांनी मंदिराला भेट दिली. फुलांची आकर्षक सजावट करण्यासाठी 20 क्विंटल फुलांचा वापर करण्यात आला आहे.

केदारघाटी हर-हर महादेव आणि जय भोलेनाथच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे. मंदिराचे मुख्य द्वार उघडून केदारनाथचे रावल भीमाशंकर लिंग आणि मुख्य पुजारी यांनी शिवलिंग मंदिरात प्रवेश केला.

सकाळी परंपरागत पूजा करुन येथील दरवाजे उघडण्यात आले. शनिवारी चारधाम यात्रेला सुरुवात झाली.

22 एप्रिलला गंगोत्री आणि यमुनोत्री धामचा दरवाजा उघडण्यात आले. आज केदारनाथ आणि 27 एप्रिलला बद्रिनाथ धामचा दरवाजा उघडणार आहे.

तत्पूर्वी, केदारनाथ रावल यांनी मंदिराच्या प्रवेशद्वारावरून सर्व यात्रेकरू आणि भाविकांना केदारनाथ धामचे महत्त्व, केदारनाथ धामची 6 महिने पूजा करण्याचे महत्त्व याविषयी माहिती दिली.

दरवाजे उघडण्याच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविकांनी बाबा केदार यांचे दर्शन घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT