PM Kisan Samman Nidhi Dainik Gomantak
देश

देशातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! PM Kisan योजनेचे बदलले नियम

तुम्हालाही पीएम किसान योजनेत नोंदणी करायची असेल, तर आता तुमच्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे

दैनिक गोमन्तक

PM Kisan Samman Nidhi: देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. तुम्हालाही पीएम किसान योजनेत नोंदणी करायची असेल, तर आता तुमच्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे, म्हणजेच रेशनकार्डशिवाय तुम्ही या योजनेत नोंदणी करू शकत नाही. पीएम किसान योजनेतील झपाट्याने वाढणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.

नवीन नोंदणीसाठी रेशनकार्ड आवश्यक आहे. आता रेशनकार्डशिवाय 2000 रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही. आता या योजनेत जो कोणी नवीन नोंदणी करेल त्याला रेशनकार्डचा क्रमांक देणे आवश्यक असेल. या योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची आर्थिक मदत देते.

लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत

आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 9 हप्ते जारी करण्यात आले आहेत आणि सरकार लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 10 वा हप्ता अॅड करणार आहे. आत्तापर्यंत 11.37 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेअंतर्गत सरकारने 1.58 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले आहेत.

पीडीएफ स्वरूपात अपलोड करावयाची कागदपत्रे

जर तुम्ही पीएम किसान योजनेअंतर्गत पहिल्यांदा नोंदणी केली तर तुम्हाला रेशनकार्ड क्रमांक अपलोड करावा लागेल. यासोबतच तुम्हाला त्याची PDF देखील अपलोड करावी लागेल. केंद्र सरकारने आता खत नोदणीची हार्डकॉपी, आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्राची अट पूर्णपणे रद्द केली आहे. म्हणजेच, आता तुम्हाला तुमची कागदपत्रे हार्डकॉपीऐवजी PDF मध्ये अपलोड करावी लागतील. केंद्र सरकारच्या या पावलामुळे फसवणुकीला आळा बसेल, त्यासोबतच नोंदणीची प्रक्रियाही सोपी होणार आहे.

योजनेसाठी कोण अर्ज करू शकतात?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे. याशिवाय तुमच्याकडे 2 हेक्टर लागवडीयोग्य जमीन असणे देखील आवश्यक आहे, ज्या शेतकऱ्यांकडे लागवडीयोग्य जमीन नाही ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती

मोदी सरकारने 24 फेब्रुवारी 2019 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत सरकार छोट्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये देते. पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान येतो. दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै आणि तिसरा 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केला जातो.

आता 10वा हप्ता लवकरच जारी होणार

पीएम किसान योजनेच्या दहाव्या हप्त्याचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील. डिसेंबर महिन्यापर्यंत सरकार या हप्त्यात कोट्यवधी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात टाकू शकते. केंद्र सरकार 15 डिसेंबर 2021 पर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता जारी करण्याचा विचार करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

VIDEO: चौकाराच्या गैरसमजात तिलक वर्माने गमावली विकेट! पिचवरच थांबला अन् झाला रनआऊट, विंडीजच्या खेळाडूंना हसू आवरेना; गंभीर भडकला

SCROLL FOR NEXT