Smriti Irani | Rahul Gandhi
Smriti Irani | Rahul Gandhi  Dainik Gomantak
देश

Smriti Irani: राहुल गांधींजी, तुम्ही नक्की अमेठीतून लढणार का? घाबरून मतदारसंघ बदलणार नाही ना?

Akshay Nirmale

Smriti Irani: यूपी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय अजय राय यांनी संकेत दिले होते की 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवतील. 2024 मध्ये राहुल गांधी वाराणसीतुनही पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देतील. यावरून केंद्रीय मंत्री आणि अमेठीच्या खासदार स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना उद्देशून खोचक प्रश्न विचारले आहेत. गत लोकसभा निवडणुकीत इराणी यांनी राहुल गांधींना अमेठीतून पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे इराणी यांनी राहुल गांधींना खोचक टोला लगावला आहे.

स्मृती इराणी म्हणाल्या की, राहुल गांधीजी मी ऐकले आहे की, तुम्ही एका प्रादेशिक स्तरावरील नेत्याकडून तुम्ही 2024 मध्ये अमेठीतून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करून घेतली आहे. हे अशोभनीय आहे. मग मी तुम्ही अमेठीतून लढणार हे नक्की समजू का? तुम्ही दुसऱ्या मतदारसंघात धावणार नाही का? घाबरणार तर नाही ना?, अशा प्रश्नांतून स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे.

दरम्यान, राहुल आणि सोनिया गांधी यांना त्यांच्या नेत्यांसाठी नवीन स्क्रिप्ट रायटर नेमण्याचा सल्ला दिला आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना भाषण लिहून देणाऱ्या नव्या लेखकाची गरज आहे. यूपी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना इराणी यांनी ही माहिती दिली. यूपी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी सोमवारी म्हटले होते की, स्मृती इराणी अमेठीत येतात आणि लटके-झटके देऊन जातात. त्यावर इराणी यांनी मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, स्त्रीबद्दल असभ्य टिप्पणी करणे ही आपली संस्कृती नाही. पण अशी वक्तव्ये केल्याने हायकमांड पदक देईल, असे काँग्रेस नेत्यांना वाटते. अशा लोकांना गांधी कुटुंब प्रोत्साहन देते, असा आरोपही इराणी यांनी केला.

दरम्यान, अजय राय यांच्या वक्तव्याचा भाजपनेही समाचार घेतला आहे. भाजपचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी म्हणाले की, काँग्रेसला राहुल गांधींचा अमेठीतील लाजिरवाणा पराभव पचवता आला नाही, म्हणूनच त्यांचे नेते महिलांबाबत अशी वक्तव्ये करतात. यामुळेच यूपीमध्ये काँग्रेसकडे एक खासदार आणि दोन आमदार शिल्लक आहेत. काँग्रेसचे नेते असेच बोलत राहिले तर आगामी काळात तेही घटतील. लडकी हूँ लड सकती हूँ, मोहीम राबवणाऱ्या प्रियंका गांधी या विधानाबद्दल अजय राय यांच्यावर कारवाई करणार का, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT