IFG Annual Summit 2023 | Piyush Goyal  Dainik Gomantak
देश

IFG Annual Summit 2023: आत्मनिर्भर भारत म्हणजे जगासाठी भारताचे दरवाजे सताड उघडणे

वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचे मत, IFG च्या अॅन्युअल समिटचे उद्घाटन

गोमंतक ऑनलाईन टीम

IFG Annual Summit 2023: भारत इतर देशांशी सहकार्य आणि भागीदारी करण्यात आघाडीवर चालला आहे. आम्ही जेव्हा आत्मनिर्भर भारत बाबत बोलतो तेव्हा आम्ही आमचे दरवाजे बंद करण्याचा विचार करत नसतो तर ते सताड उघडण्याचा विचार करतो, असे मत केंद्रीय वाणिज्य, ग्राहक व्यवहार, वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केले.

इंडिया ग्लोबल फोरम अॅन्युअल समिट 2023 च्या उद्घाटन सत्रात एक्स्क्लुझिव्ह इन्व्हेस्टर्स इंटरअॅक्शन कार्यक्रमात ते बोलत होते.

गोयल यांनी जागतिक व्यापारातील भारताच्या वाढत्या सहभागाबद्दल तसेच संवेदनशीलता, विश्वास आणि वाटाघाटी करणार्‍या संस्थांमधील मजबूत बंध यावरून भारत भागीदारी दृढ करत असल्याचे विचार मांडले.

गोयल म्हणाले, “जेव्हा आम्ही आत्मनिर्भर भारताबद्दल बोलतो तेंव्हा आम्ही जगासाठी दरवाजे बंद करण्याचा विचार करत नाही तर ते सताड उघडण्याचा विचार करतो. कारण संपूर्ण जगाला आमच्याशी बोलायचे आहे. आणि आम्ही त्यांच्याशी बोलत आहोत.

प्रत्येक देशाला काही स्पर्धात्मक फायदे आहेत. आम्हाला दर्जेदार उत्पादने हवी आहेत. मला विश्वास आहे की, येत्या काही वर्षांत भारतीय उद्योगांना उत्पादन क्षेत्रात 'मोजो' परत मिळवता येईल. जे देश परस्पर व्यवहारावर विश्वास ठेवतात, नियमांवर आधारित दृष्टीकोन पाळतात आणि पारदर्शकतेवर विश्वास ठेवतात अशा देशांशी आम्हाला व्यापार करायचा आहे.

आम्ही जगाशी समान पातळीवर संबंध ठेवू.” गोयल यांनी विकासाला चालना देण्यात, वेग वाढवण्यात आणि जगात एक उज्ज्वल ठिकाण म्हणून भारत कसा उदयास येत आहे, याविषयी मते मांडली.

इंडिया ग्लोबल फोरमचे संस्थापक आणि अध्यक्ष प्रा. मनोज लाडवा म्हणाले, “भारताचा जागतिक व्यापार वाढत आहे. औषधनिर्माण, माहिती तंत्रज्ञान आणि अक्षय उर्जा क्षेत्रात भारताने समान भागीदारीवर लक्ष केंद्रित केले आहे, ते प्रभावी आहे. मंत्री पीयूष गोयल यांनीही त्याला दुजोरा दिला आहे.

इंडिया ग्लोबल फोरमने नेहमीच भारताच्या जागतिकीकरणाच्या अजेंड्याचे नेतृतव केले आहे. IGF च्या वार्षिक शिखर परिषदेत आम्ही जागतिक स्तरावर भारताला केंद्रस्थानी आणि शीर्षस्थानी आणि कसे आणता येईल, ते पाहू.

हा कार्यक्रम स्टँडर्ड चार्टर्डने प्रायोजित केला आहे आणि VFS ग्लोबल आणि डेलॉइट हे नॉलेज पार्टनर आहेत. जागतिक समस्यांवरील उपायांवर भारताने दिशा ठरविण्याचा हा क्षण असणार आहे. 'सेटिंग द पेस' ही यंदाच्या समिटची थीम आहे.

या परिषदेत एकूण 30 थीम असणार आहेत. 500 ​​हून अधिक जण यात सहभागी होणार आहेत. त्यामध्ये संस्थापक, व्यावसायिक, नेते, धोरणकर्ते आणि गुंतवणूकदार या सर्वांना एकत्र आणून जागतिक स्तरावर वेगाने बदल घडवण्यात भारत कसा लाभदायी ठरू शकतो, यावर विचारमंथन होईल.

या परिषदेत महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी, रेल्वे-आयटी मंत्री अश्विनी वैष्णव, कामगार आणि रोजगार, पर्यावरण मंत्री मंत्री भुपेंद्र यादव सहभागी होणार आहेत.

इंडिया ग्लोबल फोरम बद्दल हा आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि जागतिक नेत्यांसाठी अजेंडा-सेटिंग मंच आहे. आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट्स आणि धोरणकर्त्यांना त्यांच्या क्षेत्रांत धोरणात्मक महत्त्वाच्या लोकांशी संवाद साधण्यासाठी या व्यासपीठाचा वापर करू शकतात. अधिक माहितीसाठी www.indiaglobalforum.com या संकेतस्थळाला भेट देता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT