cow hug Dainik Gomantak
देश

Valentine Day 2023: 'व्हॅलेंटाईन डे' दिवशी गाईला मिठी मारा, प्राणी कल्याण मंडळाचे अनोखे आवाहन

गाईला मिठी मारल्याने भावनिक समृद्धी येईल, ज्यामुळे आपला वैयक्तिक आणि सामूहिक आनंद वाढेल.

गोमन्तक डिजिटल टीम

Valentine Day 2023: भारतीय प्राणी कल्याण मंडळाने व्हॅलेंटाईन डे (14 फेब्रुवारी 2023 रोजी जोडप्यांना अनोखे आवाहन केले आहे. मंडळाने या दिवशी 'काउ हग डे' (गाईला मिठी मारणे) साजरा करण्यास सांगितले आहे.

असे केल्याने भावनिक समृद्धी आणि वैयक्तिक आनंद मिळेल, असा विश्वास भारतीय प्राणी कल्याण मंडळाने व्यक्त केला आहे.

केंद्रीय मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन मंत्रालयाच्या सूचनेनुसार हे अपील जारी करण्यात आल्याचे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले आहे.

मंडळाचे सचिव डॉ सुजित कुमार दत्ता यांनी जारी केलेल्या आवाहनात असे म्हटले आहे की, 'आपल्या सर्वांना माहित आहे की गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, आपले जीवन टिकवते, प्राणी संपत्ती आणि जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करते. माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या मातेप्रमाणे ती 'कामधेनू' आणि 'गोमाता' म्हणून ओळखली जाते.

दत्ता म्हणाले की, पाश्चात्य संस्कृतीच्या प्रगतीमुळे वैदिक परंपरा जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पाश्चिमात्य संस्कृतीच्या झगमगाटाने आपली भौतिक संस्कृती आणि वारसा जवळजवळ विसरला आहे.

गाईचे असंख्य फायदे लक्षात घेऊन गाईला आलिंगन द्यावे. गाईला मिठी मारल्याने भावनिक समृद्धी येईल, ज्यामुळे आपला वैयक्तिक आणि सामूहिक आनंद वाढेल.

त्यामुळे सर्व गोप्रेमींनीही गाईचे महत्त्व लक्षात ठेवावे. तसेच, 14 फेब्रुवारी हा दिवस काऊ हग डे (गाईला मिठी मारणे) म्हणून साजरा करा. असे आवाहनात म्हटले आहे.

बोर्डाच्या सहाय्यक सचिव प्राची जैन म्हणाल्या, प्राणी कल्याण सर्व राज्यांसाठी आहे. गुजरात आणि इतर अनेक राज्ये देखील 14 फेब्रुवारी हा दिवस 'काउ हग डे' दिवस म्हणून साजरा करतील.

गेल्या वर्षी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी रस्ते अपघातात जखमी झालेल्या भटक्या गायींवर वेळेवर उपचार आणि काळजी घेण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक रुग्णालय सुरू करण्याचे निर्देश दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT