Khalistan Protest at High Commission of India, London Dainik Gomantak
देश

Video: खलिस्तानी ओळखा! NIA ने UK मधील हिंसक निदर्शकांचा व्हिडिओ केला जारी; भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर...

Khalistan Protest: सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या लोकांबद्दल काही माहिती असल्यास त्वरित कळवावे, असे आवाहन राष्ट्रीय स्तरावरील तपास यंत्रणेने केले आहे.

Manish Jadhav

NIA: राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) 19 मार्च रोजी खलिस्तान समर्थकांनी हिंसक निदर्शनांदरम्यान लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाची तोडफोड केल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेल्या लोकांबद्दल काही माहिती असल्यास त्वरित कळवावे, असे आवाहनही तपास यंत्रणेने केले आहे. जारी केलेला व्हिडिओ सुमारे तीन मिनिटांचा आहे, ज्यामध्ये खलिस्तान समर्थकांचा जमाव दुपारी 1.46 वाजता उच्चायुक्तांकडे जाताना दिसत आहे.

दरम्यान, उच्चायुक्तालयावरील हल्ल्याप्रकरणी NIA ची एक टीम गेल्या महिन्यापासून ब्रिटनमध्ये उपस्थित असून तपास करत आहे.

18 मार्च रोजी पोलिसांनी (Police) भारतातील खलिस्तान समर्थक वारिस पंजाब देचा प्रमुख अमृतपाल सिंगवर मोठी कारवाई केली होती, ज्यामध्ये अमृतपाल फरार झाला होता.

याला जगातील अनेक देशांमध्ये खलिस्तान समर्थकांनी विरोध केला होता. दरम्यान, ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर हिंसक निदर्शने झाली.

दुसरीकडे, खलिस्तानी समर्थकांनी खलिस्तान समर्थक घोषणा दिल्या आणि झेंडेही दाखवले होते. यावेळी उच्चायुक्तालयाच्या बाल्कनीत उभ्या असलेल्या एका आंदोलकाने खांबावरुन भारतीय तिरंगा काढून टाकला होता.

खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगला आरोपातून दोषमुक्त करण्यासाठी हातात झेंडे घेऊन निदर्शने करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहेत. या हिंसक निदर्शनादरम्यान ब्रिटीश पोलिसांनी तिथे पोहोचून आंदोलकांना तेथून हटवले होते.

त्याचवेळी, आंदोलक घोषणाबाजी आणि शिवीगाळ करताना दिसले होते. 2019 मध्ये केंद्र सरकारने NIA कायद्यात बदल केले. या दुरुस्तीनंतर एनआयएला अधिक शक्तिशाली करण्यात आले.

यानंतर एनआयए आता भारताविरुद्धच्या दहशतवादी कारवायांचा तपास करत आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, अवतार सिंह खांडा हा या हिंसाचाराचा सूत्रधार आहे.

ब्रिटनमध्ये तो दुहेरी जीवन जगत असल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्तानुसार, अवतार सिंह खांडा रणजोध सिंह असून तो खलिस्तान लिबरेशन फोर्सचा प्रमुख आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: अंत्यविधीच्या ठिकाणी 'ऑर्केस्ट्रा'! एका बाजूला चिता जळतेय, दुसऱ्या बाजूला गाण्यांवर डान्स; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

Ind A vs SA A: सलामीवीर ढेपाळले, मधल्या फळीनेही हात टेकले, आफ्रिकेने टीम इंडियाला 73 धावांनी चारली पराभवाची धूळ; क्लीन स्वीपचे स्वप्न भंगले! VIDEO

Konkan Railway: कोकण रेल्वेतील मोठी कारवाई! नागरकोइल-गांधीधाम एक्सप्रेसमध्ये दारुच्या बाटल्यांनी भरलेल्या बेवारस बॅगा जप्त; 'टीसी'च्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस

Goa Tourism: आखाती देशांतील पर्यटक आकर्षित करण्यासाठी गोवा सज्ज! थेट बहरीनमध्ये आयोजित केलाय रोड शो

World Cup 2026: क्रिकेट वर्ल्ड कप शेड्यूल जाहीर, भारत-पाकिस्तान सामन्याबाबत आयसीसीनं घेतला मोठा निर्णय; चाहत्यांची वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT