Watch Video Dainik Gomantak
देश

Watch Video: हैद्राबादमध्ये 'सैराट'सारखी घटना, भावांकडून बहिणीच्या पतीचा भर रस्त्यात खून

दोघांनी घरातील लोकांच्या मनाविरूद्ध लग्न केल्याने हा खून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

हैद्राबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 25 वर्षीय व्यक्तीचा भर रस्त्यात दोन युवकांनी खून केला आहे. याचा एक थरारक व्हिडिओ देखील समोर आला आहे. ज्यात दोन युवक एकाचा पाठलाग करताना व त्यानंतर त्याला मारहाण करताना दिसत आहेत.

मुलीने घरातील लोकांच्या मनाविरूद्ध लग्न केल्याने युवकाचा खून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. लंगर हौज परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. हैद्राबादमधील न्यूज चॅनलवरती हा व्हिडिओ वारंवार दाखवला जात असून, यात दोन युवक एका व्यक्तीचा भर रस्त्यात पाठलाग करताना दिसत आहेत. तसेच, दोघांना त्या व्यक्तीला पकडून त्याच्यावर वार केल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

धारदार शस्त्राने वार केल्याने या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी केलेल्या प्राथमिक तपासात हा खून एका महिलेच्या दोन भावांनी केल्याचे समोर आले आहे. या महिलेने मागील वर्षी घरातील लोकांच्या विरोधात जाऊन त्या मुलाशी लग्न केले होते. अशी माहिती समोर आली आहे.

तसेच, या महिलेचे लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरवले तरीही मागील वर्षी तिने पळून जात दुसऱ्या मुलाशी लग्न केले. याचाच राग मुलीच्या भाव व घरच्यांना होता. त्यातून हा खून झाल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT