Hit And Run
Hit And RunDainik Gomantak

Hit And Run: कुत्र्यांना खाऊ घालत असलेल्या 25 वर्षाच्या मुलीला थार गाडीने दिली धडक

Hit And Run: अपघात झालेल्या मुलीचे नाव तेजस्वीता कौशल असे आहे. शनिवारी रात्री 11वाजून 39 मिनटाला ही घटना घडली.
Published on

अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.आता चंदीगडमध्ये हिट ॲंड रनची घटना घडली आहे. स्ट्रे डॉग्जना खाऊ घालत असलेल्या एका मुलीला थार गाडीने धडक दिल्याचे समोर आले आहे. (Hit And Run Accident Case)

मुलीला धडक दिल्यानंतर ही गाडी न थांबता वेगात निघून गेल्याचे दिसून येत आहे. चंदीगड( Chandigarh )च्या फर्निचर मार्केटमधील ही घटना असल्याची माहीती समोर आली आहे.

अपघात झालेल्या मुलीचे नाव तेजस्वीता कौशल असे आहे. शनिवारी रात्री 11वाजून 39 मिनटाला ही घटना घडली. त्यावेळी तेजस्वीता रस्त्यावरच्या कुत्र्यांना खाऊ घालत होती. गाडी चुकीच्या दिशेने आल्याचे मिळालेल्या प्राथमिक माहितीत म्हटले आहे. तेजस्वीताच्या डोक्याला मार लागला असून दवाखाण्यात तिच्यावर उपचार चालू आहेत.

ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. तेजस्वीताने आर्किटेक्टमध्ये ग्रॅजुएशन पुर्ण केले असून सध्या ती युपीएसीची तयारी करत असल्याचे तिच्या वडीलांनी म्हटले आहे.

Hit And Run
Cheetah In India: भारतात होणार परदेशी 12 चित्त्यांची एन्ट्री,नामिबिया नव्हे तर ‘या’ देशातून येणार नवे पाहुणे

तेजस्वीता रोज रात्री अपल्या आईसोबत मंदीरात जाते आणि तिथुन रस्त्यावरील कुत्र्यांना खाऊ घालून परत येते असेही तेजस्वीताच्या वडीलांनी म्हटले आहे. याआधी दिल्ली(Delhi )मध्ये अशी घटना घडल्याचे समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com