Manish Sisodia
Manish Sisodia Dainik Gomantak
देश

Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia: मनीष सिसोदियांना CBI ने बजावले समन्स, उद्या चौकशीसाठी बोलावले

Manish Jadhav

Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना उद्या सीबीआयने चौकशीसाठी बोलावले आहे. खुद्द मनीष सिसोदिया यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. सीबीआयने उद्या पुन्हा बोलावले आहे, असे ट्विट त्यांनी केले.

तपासात मी नेहमीच सहकार्य केले - सिसोदिया

सिसोदिया यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'त्यांनी सीबीआय (CBI) आणि ईडीची संपूर्ण शक्ती वापरली आहे, परंतु माझ्याविरुद्ध त्यांना काहीही मिळाले नाही. माझ्या घरावर छापा टाकण्यात आला, बँकेच्या लॉकर्सची झडती घेण्यात आली पण माझ्याविरुद्ध कुठेही काहीही मिळाले नाही. मी दिल्लीतील मुलांसाठी चांगल्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे. तपासाला मी नेहमीच सहकार्य केले आहे आणि यापुढेही करत राहीन.'

दारु घोटाळ्याची चौकशी होणार आहे

दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्यानंतर जवळपास तीन महिन्यांनी सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना चौकशीसाठी बोलावले आहे, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.

ते म्हणाले की, सिसोदिया यांना रविवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मात्र, आरोपपत्रात आरोपी म्हणून त्यांचे नाव नाही. अटक करण्यात आलेले व्यापारी विजय नायर आणि अभिषेक बोईनपल्ली यांच्यासह सात आरोपींचा आरोपत्रात समावेश आहे.

तसेच, दारु विक्रेत्यांना परवाने देण्याचे दिल्ली सरकारचे धोरण काही विक्रेत्यांच्या हिताचे असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics:...तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; आपचे डॉ. प्रमोद सावंत यांना आव्हान

'विवाहित मुस्लिम पुरुषाला लिव्ह इनमध्ये राहण्याचा अधिकार नाही': अलाहाबाद हायकोर्ट

Goa Seashore : किनाऱ्यावरील ‘ती’ जागा पूर्ववत करण्यासाठी पाहणी

Fireworks Factory Big Explosion: शिवकाशीतील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

महिलांना ‘स्वीटी’ आणि ‘बेबी’ म्हणणे लैंगिक टिप्पणी आहे का? वाचा हायकोर्टाने काय दिला निर्णय

SCROLL FOR NEXT