CBI Dainik Gomantak
देश

Oxfam India: सीबीआयची मोठी कारवाई, ऑक्सफॅम इंडियाविरुद्ध गुन्हा केला दाखल

Manish Jadhav

Oxfam India: केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बुधवारी ऑक्सफॅम इंडिया आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या जागतिक एनजीओने भारताच्या विदेशी निधी नियमांचे म्हणजेच एफसीआरए कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

कायदा मोडून देणग्या गोळा केल्या जात होत्या. सीबीआयच्या पथकाने ऑक्सफॅमच्या कार्यालयांवर छापे टाकले आहेत.

दरम्यान, 6 एप्रिल रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाने ऑक्सफॅम इंडियाच्या विरोधात सीबीआय (CBI) चौकशीची शिफारस केली होती.

2020 मध्ये एफसीआरए कायदा लागू झाल्यानंतरही वेगवेगळ्या संस्थांद्वारे परदेशी खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करणे सुरुच असल्याचे तपासात समोर आले आहे. FCRA परवान्याचे नूतनीकरण गृह मंत्रालयाने डिसेंबर 2021 मध्ये रद्द केले होते.

वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे ठेवण्याची योजना होती

ऑक्सफॅम इंडियाची केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) चौकशी केली होती. यावेळी ऑक्सफॅम इंडिया आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी वेगवेगळ्या बँक (Bank) खात्यांमध्ये पैसे ठेवण्याचा विचार करत असल्याचे ईमेलद्वारे उघड झाले. परदेशी संस्थांकडूनही निधी येत होता.

ऑक्सफॅम इंडियाला 1.50 कोटी विदेशी निधी

ऑक्सफॅम इंडिया हे सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी नोंदणीकृत असल्याचेही तपासात समोर आले आहे. ते त्यांच्या सहयोगी आणि कर्मचाऱ्यांमार्फत सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चला कमिशनच्या स्वरुपात निधी पाठवते.

ऑक्सफॅम इंडियाने 2019-20 या आर्थिक वर्षात CPR 12,71,188 रुपये भरल्याचे तपासात समोर आले आहे. कलम 194J अंतर्गत हे बेकायदेशीर आहे.

तसेच, ऑक्सफॅम इंडियाने परकीय निधी नियुक्त केलेल्या FCRA खात्यात नेण्याऐवजी थेट स्वतःच्या खात्यात टाकला. त्यांना परदेशातून जवळपास 1.50 कोटी रुपये मिळाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT