चित्रा रामकृष्ण Dainik Gomantak
देश

योगींच्या सांगण्यावरून निर्णय घेणाऱ्या चित्रा रामकृष्णला CBI ने केली अटक

को-लोकेशन प्रकरणात दिल्ली न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. या प्रकरणी सीबीआयने आनंद सुब्रमण्यमला यापूर्वीच अटक केली आहे.

दैनिक गोमन्तक

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या माजी सीईओ आणि एमडी चित्रा रामकृष्ण यांना केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने दिल्लीतून अटक केली आहे. को-लोकेशन प्रकरणात दिल्ली न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. या प्रकरणी सीबीआयने आनंद सुब्रमण्यमला यापूर्वीच अटक केली आहे. (CBI arrests Former CEO and MD of NSE Chitra Ramakrishna)

बाजार नियामक CBI च्या नुकत्याच आलेल्या तपासणी अहवालानंतर सीबीआयने (CBI) ही कारवाई केली आहे. वास्तविक, हिमालयात राहणाऱ्या एका अज्ञात 'योगी'सोबत एनएसईशी संबंधित गोपनीय माहिती शेअर केल्याप्रकरणी चित्रा रामकृष्ण यांना चौकशीला सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणातील आरोपी चित्राची सीबीआयने मुंबईत चौकशी केली आहे. आयकर विभागाने यापूर्वी मुंबई (Mumbai) आणि चेन्नई येथील चित्रा रामकृष्ण यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले होते.

त्याचवेळी, CBI ने यापूर्वीच चित्राचे सल्लागार आणि NSE चे माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यम यांना अटक केली आहे. सीबीआयच्या म्हणण्यानुसार एनएसईमध्ये 2010 ते 2015 दरम्यान कथित अनियमितता आढळून आली होती. रवी नारायण हे मार्च 2013 पर्यंत NSE चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्या काळात चित्रा कंपनीच्या डेप्युटी सीईओ होत्या. त्यांनी एप्रिल 2016 मध्ये रवी नारायण यांची जागा घेतली आणि डिसेंबर 2016 पर्यंत त्या पदावर होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

Telangana Drug Factory: ड्रग्स माफियांचा 12 हजार कोटींचा कट उधळला! तेलंगणात पोलिसांची मोठी कारवाई; 13 आरोपी गजाआड

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

SCROLL FOR NEXT