Narendra Modi & Amit Shah
Narendra Modi & Amit Shah Dainik Gomantak
देश

BJP National Executive: काँग्रेसला टक्कर देणार 3 जुने 'कॉंग्रेसी', भाजपने दिली मोठी जबाबदारी!

दैनिक गोमन्तक

BJP National Executive: 2024 च्या लोकसभा निवडणुकीला अजून एक ते दीड वर्षांचा अवधी शिल्लक आहे, पण भारतीय जनता पक्षाने आत्तापासूनच तयारी सुरु केली आहे. यातच भाजपने यापूर्वी काँग्रेसचा मोठा चेहरा असलेल्या नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांना आपल्या गोटात सामावून घेत भाजप सातत्याने धक्के देत आहे. छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये आपले स्थान आणखी मजबूत करण्यासाठी भाजपने राजकीय क्षेत्रातील अनेक बड्या चेहऱ्यांना पक्षात महत्त्वाची पदे आणि जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.

दरम्यान, प्रत्येक आघाडीवर काँग्रेसची (Congress) ढाल बनलेल्या जयवीर शेरगिल यांना भाजपने राष्ट्रीय प्रवक्ते बनवून पक्षाची मोठी जबाबदारी दिली आहे. शेरगिल हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि तर्कशुद्ध मांडणीसाठी ओळखले जातात. शेरगिल यांनी तीन महिन्यांपूर्वी काँग्रेसला अलविदा केला होता.

शेरगिल यांनी पक्षाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता

त्यावेळी, त्यांनी पक्षाच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहून पक्षातील बड्या नेत्यावर टीका केली होती. तरुणांच्या मागणीनुसार पक्षाचे नेते निर्णय घेत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला होता. त्यांच्याशिवाय पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि पक्षाविरोधात बंडखोर वृत्ती दाखवणारे माजी काँग्रेस नेते सुनील जाखड हे ही भारतीय जनता पक्षात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. पक्षाने त्यांना राष्ट्रीय कार्यसमितीचे सदस्य बनवले आहे.

कॅप्टन आणि जाखड यांनी पंजाबमध्ये भाजपला आशा दिली

कॅप्टन यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसबरोबरचा घरोबा सोडून पंजाब लोक काँग्रेस या नावाने पक्ष स्थापन केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांनी स्वतःची परंपरागत विधानसभेची जागाही गमावली होती. निवडणुकीतील पराभवानंतर काही महिन्यांनी कॅप्टन यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला होता. कॅप्टन यांच्या बहाण्याने भाजप शिखांमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करेल.

त्याचबरोबर, पंजाबचे आणखी एक तगडे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बलराव जाखड यांचे पुत्र सुनील जाखड हे देखील भाजपला मैदानात मजबूत करताना दिसणार आहेत. सिद्धू यांच्याशी झालेल्या वादामुळे त्यांनी काँग्रेस सोडली आणि मे महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला. आता पंजाबमध्ये जाखड यांच्या भाजप प्रवेशाचा भाजपला कितपत फायदा होईल हे पाहायचे आहे.

स्वतंत्र देव सिंह यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी आली

याशिवाय, पक्षाचे उत्तर प्रदेश युनिटचे माजी अध्यक्ष स्वतंत्र देव सिंग यांचीही राष्ट्रीय कार्यसमितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाने निवेदन जारी करुन याबाबत माहिती दिली आहे. भारतीय जनता पक्षाच्या उत्तराखंड युनिटचे प्रदेशाध्यक्ष असलेले मदन कौशिक यांना राष्ट्रीय कार्यकारिणीचे विशेष निमंत्रित सदस्य बनवण्यात आले आहे.

यासोबतच, छत्तीसगड भाजपचे माजी अध्यक्ष विष्णुदेव साई आणि पंजाब भाजपचे माजी अध्यक्ष मनोरंजन कालिया, अमनजोत कौर रामुवालिया आणि एस. राणा गुरमीत सिंग सोढी यांचाही राष्ट्रीय कार्यकारिणीत विशेष निमंत्रित म्हणून समावेश करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT