Navjyot Singh Sidhu Dainik Gomantak
देश

‘सिद्धूला मंत्री करण्यासाठी पाकिस्तानातून झालं होतं लॉबिंग’

दैनिक गोमन्तक

देशात आगामी काळात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे या पाच राज्यांमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पाच राज्यांमध्ये पंजाब राज्याचाही समावेश आहे. पंजाबमधील राजकीय वातावरण मागील काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेवरुन चांगलंच ढवळून निघालं होतं. यातच आता पंजाब लोक काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Capt. Amarinder Singh) यांनी रविवारी स्पष्ट केले की, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी 2017 मध्ये पक्षाने मोठा विजय मिळवला तेव्हा नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांची मंत्री म्हणून नियुक्ती करण्यासाठी लॉबिंग केले होते. (Capt Amarinder Singh Said That Navjot Singh Sidhu Was Lobbied From Pakistan To Become A Minister)

कॅप्टन यांच्या म्हणण्यानुसार, ‘’पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान यांनी फोनवर पाठवलेल्या मेसेजमध्ये सिद्धूला मंत्री बनवण्याची लेखी शिफारस केली होती. मी इम्रान खान यांना कधीही भेटलो नव्हतो किंवा त्यांना वैयक्तिकरित्या ओळखत नसल्यामुळे, पंजाबमध्ये काँग्रेसच्या विजयानंतर लगेचच असा संदेश पाहून मला आश्चर्य तर वाटले. परंतु एखाद्या व्यक्तीला राज्यमंत्रिपद मिळावे, याचाही धक्काही बसला. दुसऱ्या देशाचे पंतप्रधान आणि त्यांचे निकटवर्तीय अशाप्रकारे दबाव आणत आहेत.’’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT