Delhi IGI Airport on High Alert Dainik Gomantak
देश

Delhi Airport News: दरभंगाहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात बॉम्ब असल्याचा कॉल; दिल्ली विमानतळावर हाय अलर्ट

Delhi IGI Airport on High Alert: बिहारमधील दरभंगा येथून दिल्लीला येत असलेल्या विमानात बॉम्ब असल्याचा फोन बुधवारी दिल्ली विमानतळावर आला.

Manish Jadhav

Delhi IGI Airport on High Alert:

बिहारमधील दरभंगा येथून दिल्लीला येत असलेल्या विमानात बॉम्ब असल्याचा फोन बुधवारी दिल्ली विमानतळावर आला. प्रोटोकॉलनुसार सर्व खबरदारी घेण्यात आली आणि विमानाची तपासणी करण्यात आली. मात्र, यामध्ये काहीही संशयास्पद आढळले नाही. पोलिस फोन करणाऱ्याचा शोध घेत आहेत. 24 जानेवारी रोजी स्पाईसजेटच्या आरक्षण कार्यालयाला दरभंगाहून दिल्लीला जाणाऱ्या एसजी 8496 या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. संध्याकाळी 6 वाजता विमान दिल्ली विमानतळावर सुरक्षित उतरले. स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, आज IGI विमानतळाच्या नियंत्रण कक्षात एक फोन कॉल आला. कॉलरने दरभंगाहून दिल्लीला येणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. हे विमान IGI विमानतळावर उतरणार होते. मात्र, चौकशीत हा कॉल बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

याआधी, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. ही धमकी एका ईमेलद्वारे आली होती. स्फोट टाळण्यासाठी मेल पाठवणाऱ्याने 48 तासांत 1 दशलक्ष डॉलर्सची मागणी केली होती, ते ही बिटकॉइनमध्ये. बिटकॉइनमध्ये रक्कम दिली नाही तर परिस्थिती बिकट होईल, असे ईमेलमध्ये पुढे म्हटले होते.

यापूर्वी, ऑगस्टमध्ये दिल्ली-पुणे विमानात बॉम्ब असल्याची बातमी आली होती. विस्तारा विमानात बॉम्ब असल्याची माहिती विमानतळावर मिळाली होती. बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. कॉल येताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. त्याचवेळी, विस्तारा एअरलाइन्सच्या दिल्ली-पुणे फ्लाइटमध्ये बॉम्ब ठेवल्याची बातमी अफवा ठरली होती. तपासाअंती विमानात कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT