Goa Accident  Dainik Gomantak
देश

Loksabha Election: मध्यप्रदेशात होमगार्ड, पोलिसांना घेऊन जाणारी बस उलटली; २१ जण जखमी

Madya Pradesh: सुरक्षा कर्मचारी छिंदवाडा जिल्ह्यात निवडणूक ड्युटीवरून परतत होते जेथे लोकसभा निवडणूक 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी पार पडले.

Ashutosh Masgaunde

मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात शुक्रवारी एका बसने एका ट्रकला धडक दिल्याने तब्बल एकवीस होमगार्ड आणि मध्य प्रदेश पोलीस कर्मचारी जखमी झाले.

सुरक्षा कर्मचारी छिंदवाडा जिल्ह्यात निवडणूक ड्युटीवरून परतत होते जेथे लोकसभा निवडणूक 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी पार पडले, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी भरलेली बस छिंदवाडा जिल्ह्य़ातून राजगढ येथे मतदान कर्तव्यावरून परतत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकली, ती उलटली आणि राष्ट्रीय महामार्ग 47 वर बेतूलमधील बरेथा घाटाजवळील खड्ड्यात पडली. परिणामी किमान २१ कर्मचारी जखमी झाले.

"गंभीर जखमी झालेल्या आठ जवानांवर बैतुल येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर 13 सैनिकांवर शाहपूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत," असे अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान अपघातग्रस्त बसमध्ये 44 सुरक्षा कर्मचारी होते. त्यापैकी पाच राज्य पोलिसांचे होते, तर उर्वरित होमगार्डचे कर्मचारी होते.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, बस समोरून जाणाऱ्या एका ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होती आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या ट्रकला धडकली. धडक एवढी भयानक होती की बस पलटी होऊन खड्ड्यात पडली, परिणामी वाहनातील २१ सुरक्षा कर्मचारी जखमी झाले.

हा अपघात कोणत्या कारणांमुळे झाला, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Verna Fire: भंगारअड्ड्याच्या मालकाचे सर्व आरोप खोटे, शरीफ कोणतेही भाडे देत नसल्याचा जुझे कुटुंबीयांचा दावा

Vasco Bangalore Special Train: नाताळ आणि नववर्षानिमित्त धावणार विशेष रेल्वेगाड्या, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Shilpa Shetty Goa Hotel: शिल्पा शेट्टीच्या 'बास्टिन रिव्हेरा' हॉटेलवर पडणार हातोडा? खारफुटीच्या जमिनीत बांधकामास परवानी कशी? कोसंबेंचा सवाल

Uterine Cancer: राज्यात 'एचपीव्‍ही'मुळे दरमहा आठ महिलांना गर्भाशय कॅन्‍सर, 5 वर्षांत 527 रुग्‍ण

Goa Politics: काँग्रेसजनांनी 'आप'मध्ये यावे, अरविंद केजरीवालांची काँग्रेस कार्यकर्त्यांना हाक

SCROLL FOR NEXT