CISF Dainik Gomantak
देश

जम्मूतील चढ्ढा कॅम्पजवळ CISFच्या बसवर दहशतवादी हल्ला, ASI जवान शहीद तर 8 जखमी

15 सीआयएसएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर हा हल्ला

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीरमध्ये आज शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा सीआयएसएफच्या (CISF) बसवर दहशतवादी हल्ला झाला. मिळालेल्या माहितीनुसार, बसवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला असून, यामध्ये एक एएसआय शहीद झाला आहे. सकाळच्या शिफ्टमध्ये ड्युटीवर जाणाऱ्या 15 सीआयएसएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. जम्मूतील चड्ढा कॅम्पजवळ पहाटे 4.25 वाजता ही घटना घडली.

न्यूज एजन्सी एएनआयने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले- “सीआयएसएफने दहशतवादी हल्ला टाळला, जवानांनी प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले आणि दहशतवाद्यांना पळून जाण्यास भाग पाडले. या कारवाईत सीआयएसएफच्या एका एएसआयला आपला जीव गमवावा लागला आणि दोन जण जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात 1 CISF जवान शहीद झाला आहे, तर 8 जवान जखमी झाले आहेत. त्याचबरोबर सुरक्षा दलांनी 1 दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. एएनआयने जम्मू-काश्मीर पोलिसांच्या हवाल्याने सांगितले की, बारामुल्ला चकमकीत एकूण 4 दहशतवादी मारले गेले आहेत. त्यापैकी सर्वोच्च लष्कर कमांडर युसूफ कांत्रोने 2020 मध्ये बीडीसी अध्यक्ष सरदार भूपिंदर सिंग यांची हत्या केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमेपलीकडे बसलेल्या दहशतवाद्यांनी या हल्ल्याची योजना आखली होती, जेणेकरून पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी जम्मूमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणता येईल. गुरुवारी कठुआमध्ये पाच संशयितांना अटक करण्यात आली होती, त्यांच्याकडून नकाशे आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले होते. या संशयितांच्या चौकशीदरम्यान सुरक्षा यंत्रणांना महत्त्वाची माहिती मिळाली होती, ज्यामध्ये जैश-ए-मोहम्मदला हल्ल्याची जबाबदारी देण्यात आली होती.

ठोस माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या पथकांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. जम्मूच्या बाहेरील सुषमा आणि जलालाबाद दरम्यानच्या भागात दहशतवाद्यांची उपस्थिती आढळून आली आणि शुक्रवारी सकाळी दहशतवाद्यांशी चकमक सुरू झाली. सुरक्षा दलांसोबत दहशतवाद्यांची चकमक अजूनही सुरू असून आजूबाजूच्या परिसराला वेढा घातला आहे. विशेष म्हणजे 24 एप्रिल रोजी पंचायत दिनानिमित्त पंतप्रधान जिल्हा विभागातील पल्ली गावात येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

Royal Enfield Upcoming Bikes: 'रॉयल एनफील्ड' आणणार 5 नव्या बाइक्स, 750cc सेगमेंटपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत अनेक पर्याय मिळणार

October Heat: 'ऑक्टोबर हिट'मध्ये रुग्णवाहिका बंद पडली; मदतीला धावले अनोळखी हात, पण अधिकारी उभा राहिला बाजूला!

Waste Management: गोव्यात दररोज 3,824 किलो जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया; आकडेवारी आली समोर

Surya Gochar 2026: पैशांची चणचण संपणार, धनलाभाचा जबरदस्त योग! सूर्य गोचर ठरणार वरदान; 16 नोव्हेंबरपर्यंत 'या' 6 राशींची चांदी

SCROLL FOR NEXT