पाकिस्तानी ड्रोन

 

Dainik Gomantak

देश

BSF ने फिरोजपूर सीमेजवळ पाकिस्तानी ड्रोन केले जप्त

अमरकोटजवळील बॉर्डर आउट पोस्टवर BSF च्या गस्ती पथकाला कर्कश आवाज आला.

दैनिक गोमन्तक

सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी पंजाबच्या (Punjab) फिरोजपूर सीमा भागात एक ड्रोन जप्त केला. BSF च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जप्त केलेले ड्रोन मेड इन चायना असून ते पाकिस्तानकडून (Pakistan) भारतीय हद्दीत आले आहे. बीएसएफचे वरिष्ठ अधिकारी परिसरात पोहोचून शोध मोहिमेत जवानांना मदत करत आहेत. मात्र, ड्रोनमध्ये कोणत्या प्रकारच्या शस्त्रांचा वापर करण्यात आला होता की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही.

बीएसएफने (BSF) म्हटले आहे की, अमरकोटजवळील बॉर्डर आउट पोस्टवर बीएसएफच्या गस्ती पथकाला कर्कश आवाज आला. हे ड्रोन खूपच खालच्या दिशेने उडत होते आणि आंतरराष्ट्रीय सीमेपासून ते सुमारे 300 मीटर आणि बीएसएफपासून 150 मीटर अंतरावर दिसत होते. ड्रोनचा वापर कोणत्या उद्देशाने करण्यात आला हे शोधण्यासाठी बीएसएफच्या अनेक पथकांनी परिसरात शोध मोहीम राबवली आहे.

गेल्या महिन्यात फिरोजपूरच्या जीरा उपविभागातील सेखवान गावात टिफिन बॉक्समध्ये हातबॉम्ब सापडला होता. वनविभागाच्या (forest department) काही अधिकाऱ्यांना हा टिफिन बॉक्स सापडल्याचे पोलिसांनी सांगितले होते. त्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख हरमनदीप सिंग हंस पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि बॉम्ब निकामी पथकाला पाचारण करून तो निकामी करण्यात आला.

गेल्या काही महिन्यांत अमृतसर ग्रामीण, कपूरथळा, फाजिल्का आणि तरन तारण येथूनही टिफिन बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. अमृतसरमध्ये भारत-पाकिस्तान सीमेजवळ स्फोटकांनी भरलेला टिफिन सापडल्याने पंजाब पोलिसांनी स्वातंत्र्य दिनापूर्वी मोठा दहशतवादी हल्ला हाणून पाडला. हे स्फोटक नष्ट केल्यानंतर पोलिसांनी हे स्फोटक पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे भारताच्या हद्दीत पाठवले असावेत, असे सांगितले होते.

महिला गोळ्या झाडून हत्या
जम्मूमधील (Jammu) आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाने एका पाकिस्तानी महिला घुसखोराला ठार मारले होते. सीमा सुरक्षा दलाचे उपमहानिरीक्षक एसपी एस संधू यांनी सांगितले की, सतर्क जवानांनी गेल्या आरएस पुरा सेक्टरमध्ये घुसखोराला ठार केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

SCROLL FOR NEXT