Court  Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh Crime: भावावर 79 वेळा तर भाचीवर 73 वेळा वार... कोर्टाने शिक्षा सुनावताच ढसा-ढसा रडला!

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात 2014 मध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात 2014 मध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. 9 वर्षांपूर्वी पुरंदरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माणिक तालाब गावात चुलत भाऊ आणि भाचीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यावर अतिरिक्त सत्र आणि विशेष न्यायाधीश I पवन कुमार श्रीवास्तव यांनी खूनाचा आरोपी चुलत भाऊ बैजू चौधरी याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय, 2.25 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

दरम्यान, शिक्षा सुनावताना आरोपी कोर्ट रुममध्ये रडायला लागला होता. आरोपी बैजू चौधरीच्या वडिलांचे निधन झाले. कौटुंबिक मालमत्ता देखील विभागली गेली. फाळणीच्या वेळी लहान असल्याने बैजूने आपल्या काकांवर बहुतेक मालमत्ता हडप केल्याचा आरोप केला होता.

दुहेरी हत्याकांडातील आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली

दुसरीकडे, या प्रकरणावरुन काका-पुतण्यामध्ये वैर होते. या वादातून 2 एप्रिल 2014 रोजी बैजू चौधरी याने चुलत भाऊ कबीर चौधरी याच्यावर चाकू आणि तलवारीने वार केले. स्वत:चा बचाव करण्यासाठी कबीर घरातून पळून गेला पण वार झाल्याने तो काही अंतरावर पडला. दरम्यान, शाळेतून परतणाऱ्या भाची ग्यांती हिने त्याला पाहिले आणि तीही तेथून पळू लागली. मात्र आरोपींनी निष्पाप भाचीलाही सोडले नाही. मारेकऱ्याने काकावर 79 आणि भाचीवर 73 वार केले. त्यांचा जागीच मृत्यू झाला.

तसेच, मृताचे वडील राजेंद्र चौधरी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीला अटक करुन त्याची कारागृहात रवानगी केली. पोलिसांनी 24 जून 2014 रोजीच या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. खटल्यादरम्यान, फिर्यादी पक्षाने एकूण 10 साक्षीदार आणि इतर कागदोपत्री पुरावे सादर केले आणि सहायक जिल्हा सरकारी वकील फौजदार देवेंद्र पांडे यांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. परिणामी, न्यायालयाने बैजूचे हे कृत्य जघन्य अपराध मानले आणि त्याला 2.25 लाख रुपयांच्या दंडासह फाशीची शिक्षा सुनावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coconut Prices: नारळाचे उत्पादन घटले, पण दर वाढलेले नाहीत! '50-60 रुपयांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका'

Nepal Flood: नदीचं खवळलेलं पाणी, पूल तुटण्याच्या मार्गावर... समोर मृत्यू दिसत असतानाही कुटुंबासाठी धावला 'बाप' Watch Video

Stray Cattle: शिवोलीत भटक्या गुरांचा उपद्रव वाढला; मुख्य रस्त्यावर ठाण, छोटे-मोठे अपघात नित्याचे, वाहनचालक त्रस्त

Goa Cashew: काजूच्या बागा वाढल्या, पण उत्पादन घटले! 7 वर्षांत तब्बल 3,683 टनांची घट; यंदा अवघी 65 टनांची वाढ

Goa Delhi Indigo Flight: मोठा अनर्थ टळला! उड्डाणानंतर इंडिगो विमानाचे इंजिन अचानक फेल; मोपा एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवासी सुरक्षित

SCROLL FOR NEXT