Viral Video Dainik Gomantak
देश

Video: पूरामध्ये पूल गेला वाहून, खांद्यावर रिक्षा उचलून गावकऱ्यांनी नदी केली पार; उधमपूरमधील जीवघेणा व्हिडिओ व्हायरल

Tawi River Video: तवी नदीवर (Tawi River) पूल नसल्यामुळे येथील नागरिकांवर खांद्यावर ऑटो रिक्षा उचलून जीव धोक्यात घालून नदी पार करण्याची वेळ आली आहे.

Manish Jadhav

Tawi River Video: जम्मू-काश्मीरमधील नैसर्गिक आपत्तीने येथील लोकांचे जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. याचदरम्यान, लोकांच्या उद्धवस्त जीवनाची हृदयद्रावक कहाणी उधमपूर जिल्ह्यातील बंट गावातून समोर आली आहे. गावात तवी नदीवर (Tawi River) पूल नसल्यामुळे येथील नागरिकांवर खांद्यावर ऑटो रिक्षा उचलून जीव धोक्यात घालून नदी पार करण्याची वेळ आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्याने प्रशासनाच्या उदासीनतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले.

आधी हा व्हिडिओ पाहा!

पूल वाहून गेल्याने गावकऱ्यांवर मोठे संकट

बंट गावातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील एक महत्त्वाचा पूल वाहून गेला. या पुलामुळे गावकऱ्यांचा संपर्क बाहेरील जगाशी तुटला. दररोजच्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि कामासाठी गावकऱ्यांकडे नदीतून चालत जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. याच मजबुरीमुळे येथील नागरिक आपापल्या वस्तू आणि अगदी ऑटो रिक्षासारखी वाहनेही आपल्या खांद्यावर घेऊन नदी पार करत आहेत.

बंट गावातील एका नागरिकाने आपल्या वेदना व्यक्त करताना सांगितले की, "येथील शाळेतील मुलांना, वृद्ध आणि आजारी लोकांना देखील ही नदी पार करावी लागते. ही नदी खूप खोल आहे आणि ती पार करणे खरोखरच धडकी भरवणारे आहे, पण आम्ही दुसरे काय करु शकतो? कोणत्याही विभागाने आम्हाला कोणतीही मदत केलेली नाही."

कोणीही मदत केली नाही

बंट गावातील रहिवासी देस राज यांनी माध्यमांशी बोलताना परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट केले. ते म्हणाले, "जवळपास 10 वर्षांनंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे हा पूल पूर्णपणे वाहून गेला. आम्ही प्रत्येक विभागाशी संपर्क साधला. आम्ही जिल्हाधिकारी (DC) यांच्याकडे गेलो आणि स्थानिक आमदार (MLA) यांच्याकडेही मदतीची मागणी केली, पण कोणीही आमचे ऐकले नाही."

देस राज यांनी केंद्र सरकारला हात जोडून अपील केले की, गरीब लोकांचा हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवावा. त्यांनी सांगितले की, "या संकटात सर्वात जास्त त्रास लहान मुलांना आणि आजारी व्यक्तींना होत आहे. आमच्याकडे प्रवासासाठी कोणतेही साधन उरलेले नाही. येथून समरोलीपर्यंत (Samroli) पायी जाण्यासाठी आम्हाला चार तास लागतात." या भयानक परिस्थितीत, वेळेवर उपचार न मिळाल्यास कोणाचाही जीव जाण्याची शक्यता आहे.

काश्मीरमध्ये मोठे नुकसान

गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण भागामध्ये मोठे नुकसान झाले. पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या (Landslide) घटना घडल्या, ज्यामुळे अनेक घरे आणि इमारती मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या. या दुर्घटनांमध्ये अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध वैष्णो देवी यात्राही काही काळासाठी थांबवण्यात आली.

मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे नुकसान झाले असताना, उधमपूरमधील बंट गावातील नागरिकांना तातडीने मदतीची गरज आहे. वाहून गेलेला पूल तातडीने बांधणे किंवा पर्यायी व्यवस्था करणे, हे येथील नागरिकांसाठी जगण्या-मरण्याचा प्रश्न बनला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन गावकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Edberg Pereira Assault Video: पोलिसांनी लाथा घातल्या, मारहाण केली; परेरा मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर, पाहा व्हिडिओ

Edberg Pereira Assault Case: एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी निलंबित PSI निलेश वळवईकरांवर गुन्हा दाखल; पुढील तपास सुरु

Sleep Problem: झोपण्यापूर्वीच्या 'या' चुका तुम्हाला बनवत आहेत आजारी! वेळीच व्हा सावध

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

SCROLL FOR NEXT