Sukhjinder Singh Randhawa Twitter/ @ANI
देश

Breaking: पंजाबच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबत 2 ते 3 तासात निर्णय होणार

पंजाबच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबत पुढील 2-3 तासात निर्णय घेतला जाईल असे काँग्रेसचे आमदार सुखजिंदर सिंह रंधावा (Sukhjinder Singh Randhawa) सांगितले.

दैनिक गोमन्तक

पंजाब काँग्रेसमधील गोंधळादरम्यान अंबिका सोनी यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री पदाची दिलेली ऑफर नाकारली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी रविवारी सकाळी पंजाबच्या मुख्यमंत्री म्हणून अंबिका सोनी यांचे नाव पुढे केले होते. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंबिका सोनीने स्वतःला पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, चंदिगडमध्ये पंजाबचे नवे मुख्यमंत्री घोषित करण्यासंबंधी काँग्रेसचे आमदार सुखजिंदर सिंह रंधावा म्हणाले की, येत्या २-३ तासात यासंबंधी निर्णय घेतला जाईल. पक्षाने स्पष्ट केले आहे की, पंजाबचे मुख्यमंत्री आज हायकमांडद्वारेच निवडले जातील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधींसह पक्षाच्या हायकमांडने पंजाबच्या मुख्यमंत्रिपदासाठी एकमताने अंबिका सोनी यांचे नाव पुढे केले.

दरम्यान माहितीनुसार, मुख्यमंत्री कार्यालयाचे हेलिकॉप्टर अंबिका सोनी यांना घेऊन आणण्यासाठी रवाना झाल्याचेही वृत्त आले होते. परंतु अंबिका सोनी यांनी मुख्यमंत्री होण्यास नकार दिल्याने या अटकळांचाही अंत होताना दिसत आहे. जरी हायकमांड त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करु शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय निरीक्षकांना सिद्धू कॅम्पच्या विरोधाला सामोरे जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, अशी बातमी आहे की, नवज्योतसिंग सिद्धू यांचा गट विधिमंडळ पक्षाची बैठक घेण्याची मागणी करत आहे.

अंबिका सोनी दुखावल्या?

येथे, सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे की, पंजाबच्या मुख्यमंत्री म्हणून अंबिका सोनी यांचे नाव निश्चित करण्याच्या निर्णयाबरोबरच काँग्रेसने आज होणारी विधिमंडळ पक्षाची बैठकही रद्द केली आहे. मात्र, अंबिका सोनी यांनी आरोग्याचा हवाला देत मुख्यमंत्रिपदाची ऑफर नाकारली आहे. तथापि, आरोग्याच्या कारणांव्यतिरिक्त, पंजाब काँग्रेसमधील गोंधळामुळे ती दुखावली असल्याचेही म्हटले जाते. अंबिका सोनी ही कॅप्टन यांच्या गटातील नेत्या असल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Banyan Plantation: राज्‍यभरात लावणार वडाची 10 लाख रोपटी, जैवविविधता मंडळामार्फत महिनाभर करणार मोफत वितरण- मुख्‍यमंत्री सावंत

IIT Project Farmagudi: फर्मागुढी 'आयआयटी'ला विरोधासाठी विरोध नको! देवस्थानला धक्का लागणार नाही;CM प्रमोद सावंताचे स्पष्टीकरण

Goa Politics: राजकारणात खळबळ! सासष्टीतील मतं फोडण्यासाठी भाजपकडून 100 कोटींची तरतूद; गिरीश चोडणकरांचा गंभीर आरोप

Horoscope: महिन्याच्या शेवटच्या दिवशी 'या' 4 राशींचे नशीब चमकणार; करिअर, व्यवसायात मोठ्या यशाचे संकेत

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

SCROLL FOR NEXT