Brazilian Model Voted: Dainik Gomantak
देश

सीमा, स्विटी, सरस्वती, रश्मी.... ब्राझीलमधील मॉडेलचा फोटो वापरून 10 बूथवर 22 वेळा मतदान; राहुल गांधी यांचा नवा खुलासा

Brazilian Model Voted: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप करताना सत्ताधारी भाजप आणि निवडणूक आयोगाला पुन्हा लक्ष्य केले.

गोमंतक ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज हरियाना विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप करताना सत्ताधारी भाजप आणि निवडणूक आयोगाला पुन्हा लक्ष्य केले. ‘‘हरियाणात काँग्रेसचा २२ हजार ७७९ मतांनी पराभव झाला असला तरी प्रत्यक्षात २५ लाख मतांची चोरी झाली आहे,’’ अशी तोफ त्यांनी डागली.

मतचोरीसाठी बनावट फोटो, नावे आणि पत्त्यांचा वापर झाला असून ब्राझीलमधील मॉडेलचे फोटो अनेक मतदारांच्या फोटोच्या ठिकाणी वापरल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला. राहुल यांच्या या आरोपांचे निवडणूक आयोगाने खंडन केले असून भाजपनेही त्यांच्यावर टीका केली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या (ता. ६) मतदान होणार असून कॉँग्रेस नेते राहुल गांधींनी हरियानातील मतचोरीवरून हल्लाबोल केला.

‘‘ब्राझीलमधील महिला मॉडेलचा फोटो वापरून दहा बूथवर सीमा, स्विटी, सरस्वती, रश्मी यासारख्या नावाने २२ वेळा मतदान झाले.

एक लाख २४ हजार १७७ मतदारांचे बनावट फोटो वापरण्यात आले. तसेच बनावट मतदारांच्या मदतीने एकूण पाच लाख २१ हजार ६१९ मतांची चोरी झाली. हा प्रकार केंद्रीय कारस्थान आहे, ’’ असे राहुल यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

NSA In Goa: गुन्हेगारी कृत्यांवर वचक ठेवण्यासाठी गोवा सरकारने उचलले मोठे पाऊल, राज्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू

Goa Today's News Live: 8.50 कोटी रुपयांची थकबाकी; मुरगाव पालिकेची इंडियन ऑईला कारणे दाखवा नोटीस

Goa Politics: खरी कुजबुज; युतीचा आवेश संपला का?

बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाने गाठले, परदेशातून लग्नासाठी गोव्यात आलेल्या ‘लिओ’चा अपघाती मृत्यू

VIDEO: "वेळीच सुधारणा केली नाही तर..." चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी गौतमचा शुभमन गिलला 'गंभीर' इशारा! सरावादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT