Supreme Court  Dainik Gomantak
देश

Nuh Communal Violence: 'मुस्लिमांवर बहिष्कार टाकतायेत, मायलॉर्ड हस्तक्षेप करा...', नूह हिंसाचारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल

Nuh Violence:हरियाणातील नूह येथे झालेल्या भीषण हिंसाचारानंतर गुरुग्राम, नोएडा, फरिदाबाद आणि गाझियाबाद या शहरांमध्येही तणावाचे वातावरण आहे.

Manish Jadhav

Nuh Communal Violence: हरियाणातील नूह येथे झालेल्या भीषण हिंसाचारानंतर गुरुग्राम, नोएडा, फरिदाबाद आणि गाझियाबाद या शहरांमध्येही तणावाचे वातावरण आहे.

यादरम्यान अनेक ठिकाणी पोस्टर आणि भाषणांच्या माध्यमातून मुस्लिमांवर आर्थिक आणि सामाजिक बहिष्कार टाकण्याच्या घोषणाही देण्यात आल्या.

यातच आता, सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करुन या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अर्जात म्हटले आहे की, नूह येथील हिंसाचारानंतर अनेक गटांनी मुस्लिमांवर सामाजिक आणि आर्थिक बहिष्काराची घोषणा केली आहे.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी हा अर्ज दाखल केला आहे.

कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी या अर्जात म्हटले आहे की, 'गुरुग्राममध्ये जे काही घडत आहे, ती अत्यंत गंभीर बाब आहे.

तिथे पोलिसांच्या उपस्थितीत लोकांना इशारा देण्यात आला की, जर तुम्ही तुमच्या दुकानात मुस्लिमांना कामावर ठेवले तर तुम्हाला 'देशद्रोही' म्हटले जाईल. आम्ही हा तातडीचा ​​अर्ज दाखल केला आहे.'

शाहीन अब्दुल्ला यांच्या वतीने दाखल केलेल्या अर्जाचा बचाव करताना कपिल सिब्बल म्हणाले की, नूह हिंसाचारानंतर अनेक राज्यांमध्ये असे कार्यक्रम झाले आहेत, ज्यामध्ये असे आवाहन करण्यात आले आहे. हे आक्षेपार्ह असून तुम्ही त्यात हस्तक्षेप करावा.'

गेल्या आठवड्यातच सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमधील विश्व हिंदू परिषदेच्या आयोजनावर सुनावणी करताना द्वेषयुक्त भाषण देऊ नये, असे सांगितले होते.

याशिवाय कोणत्याही अप्रिय भाषणांची संपूर्ण माहिती व्हावी यासाठी प्रशासनाला व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास सांगण्यात आले.

दुसरीकडे, न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात 2 ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओचाही हवाला देण्यात आला आहे.

हा व्हिडिओ हिस्सारचा आहे, ज्यामध्ये स्थानिक मुस्लिमांना कामावर ठेवल्यास त्यांच्यावर बहिष्कार टाकला जाईल, असे म्हटले आहे. पोलिसांच्या उपस्थितीत अशी भाषणे दिली जाणे, हा एक प्रकारचा अल्पसंख्याकांना धोका असल्याचे ते म्हणाले.

यापूर्वी, गाझियाबादच्या (Ghaziabad) नंदग्राम भागातही असेच पोस्टर दिसले होते, ज्यामध्ये मुस्लिमांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले होते. या अर्जात मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील 4 ऑगस्टच्या भाषणाचाही उल्लेख करण्यात आला आहे.

विहिंपचे नेते कपिल स्वामी यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुस्लिमांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केल्याचे अर्जात म्हटले आहे.

याशिवाय, 6 ऑगस्ट रोजी पंजाबमधील फाजिल्का येथे बजरंग दलाच्या नेत्यावर नसीर आणि जुनैद यांच्या हत्येचे समर्थन केल्याचा आरोप करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT