Mobile Battery Explosion Dainik Gomantak
देश

Viral Video: मूर्खपणाचा कळस! बॅटरी तपासताना तोंडातच स्फोट; मोबाईल दुकानातील थरकाप उडवणारा 'तो' व्हिडिओ व्हायरल

Mobile Battery Explosion: बॅटरी चवताच काही सेकंदातच तिचा अचानक स्फोट झाला आणि आगीचा गोळा थेट त्या मुलाच्या तोंडावर उडाला.

Manish Jadhav

Mobile Battery Explosion: मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होण्याच्या घटना आपण अनेकदा ऐकतो, ज्यामागे सहसा खराब बॅटरी, स्वस्त लोकल चार्जरचा वापर किंवा फोन ओव्हरहीट होणे अशी कारणे असतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यातील अपघाताचे कारण पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. एका मोबाईलच्या दुकानात घडलेल्या या धक्कादायक घटनेत एक मुलगा चक्क लिथियम बॅटरी दातांनी चावताना दिसत आहे.

बॅटरी चवताच काही सेकंदातच तिचा अचानक स्फोट झाला आणि आगीचा गोळा थेट त्या मुलाच्या तोंडावर उडाला. या स्फोटामुळे मुलगा गंभीररीत्या भाजला. त्याचा हा व्हिडिओ 'एक्स' वर शेअर करण्यात आला असून मोबाईल दुरुस्तीच्या दुकानात घडलेला हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

व्हिडिओमध्ये दिसते की, तो मुलगा हातातील फोनची बॅटरी तोंडाजवळ नेऊन ती दातांनी चावत आहे. कदाचित ती बॅटरी खरी आहे की नाही हे तपासण्याचा त्याचा हा अघोरी प्रयत्न असावा. मात्र, लिथियम बॅटरीवर दबाव पडताच त्यातील रसायनांच्या प्रक्रियेमुळे जोरदार स्फोट झाला. आगीच्या ज्वाळांनी मुलाचा चेहरा पूर्णपणे काळवंडला गेला. या घटनेने दुकानातील मालकही प्रचंड घाबरला असून त्याने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तात्काळ तिथून बाजूला होण्याचा प्रयत्न केला आणि जळलेली बॅटरी बाहेर फेकून दिली. जखमी मुलाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) प्रतिक्रियेचा महापूर आला. अनेक युजर्संनी या मुलाच्या वागण्यावर आश्चर्य आणि संताप व्यक्त केला. एका युजरने म्हटले की, "लिथियम बॅटरीमध्ये इतर बॅटरींच्या तुलनेत उच्च ऊर्जा साठवलेली असते, त्यामुळे तिच्याशी अशा प्रकारे छेडछाड करणे जीवावर बेतू शकते." दुसऱ्या एका युजरने याला "केवळ बेजबाबदारपणा आणि मूर्खपणा" असे संबोधले.

"कुणी बॅटरी चघळण्याचा विचार तरी कसा करु शकतं?" असा प्रश्न अनेक नेटकऱ्यांनी उपस्थित केला. एका युजरने अत्यंत मार्मिकपणे लिहिले की, "एका क्षणाचा मूर्खपणा आयुष्यभराचे नुकसान करुन जातो." ही घटना मोबाईल बॅटरी हाताळताना किती काळजी घ्यावी, याचे एक भयानक उदाहरण ठरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT