

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेतील चौथा सामना आज रंगणार असून, या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. पहिल्या तीन सामन्यांत विजय मिळवत भारताने मालिका आधीच खिशात घातली आहे.
मालिकेत अद्याप दोन सामने बाकी असले तरी संघ व्यवस्थापन आगामी सामन्यांत काही बदल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः सलामीवीर संजू सॅमसनचा फॉर्म चर्चेचा विषय ठरला आहे. सॅमसनला सुरुवातीच्या सामन्यांत अपेक्षित धावा करता आलेल्या नाहीत. त्यामुळे संघ व्यवस्थापन नव्या योजनांचा विचार करत असून, चौथ्या सामन्यात श्रेयस अय्यरला संधी मिळू शकते, अशी चर्चा सुरू आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर श्रेयस अय्यरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात तो नेटमध्ये तुफान फटकेबाजी करताना दिसत आहे. त्याच्या आक्रमक शैलीमुळे आणि आत्मविश्वासपूर्ण फलंदाजीमुळे तो संघात पुनरागमन करणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
चौथ्या सामन्यात भारत संघ कोणते बदल करतो, याकडे क्रिकेटप्रेमी आणि तज्ञांचे लक्ष लागले असून, युवा खेळाडूंना संधी देण्याची रणनीती संघ व्यवस्थापन अवलंबणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.