Jaffer Sadiq Tamil Film Producer Arrested & Udayanidhi Stalin Dainik Gomantak
देश

बॉलीवूड-टॉलिवूडचे ड्रग्ज सिंडिकेटशी पुन्हा संबंध, तमिळ चित्रपट निर्मात्याला अटक; उदयनिधी स्टॅलिन यांचे नाव आले समोर

Jaffer Sadiq Tamil Film Producer Arrested: एनसीबीने (NCB) जफर सादिक या तमिळ चित्रपट निर्मात्याला आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेट चालवल्याप्रकरणी अटक केली आहे.

Manish Jadhav

Jaffer Sadiq Tamil Film Producer Arrested: एनसीबीने (NCB) जफर सादिक या तमिळ चित्रपट निर्मात्याला आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेट चालवल्याप्रकरणी अटक केली आहे. दिल्लीतील स्पेशल सेलच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली. यातच आता, जफर सादिकच्या चौकशीत मोठे खुलासे समोर आले आहेत. चौकशीदरम्यान जफर सादिकने सांगितले की, त्याचे संबंध भारत-ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड येथील ड्रग कार्टेलशी आहेत. जफर सादिक या ड्रग्ज व्यवसायातून मिळालेला पैसा फिल्म मेकिंग, रिअल इस्टेट, हॉटेल आणि इतर व्यवसायात गुंतवत होता. गेल्या आठवड्यातच या सिंडिकेटशी संबंधित तीन आरोपी पकडले गेले.

4 हजार कोटी रुपयांच्या ड्रग्जचा पुरवठा

दरम्यान, सिंडिकेटशी संबंधित या तीन आरोपींच्या चौकशीदरम्यान जफर सादिकची माहिती मिळाली. जफर सादिक याचा शोध घेतला असता 15 फेब्रुवारीपासून फरार असल्याचे निष्पन्न झाले. तो त्रिवेंद्रम, मुंबई, पुणे, हैदराबाद आणि जयपूर येथे लपून बसला होता. त्याच्या ताब्यातून 50 किलोग्राम स्यूडोफेड्रिल जप्त करण्यात आले आहे. हे स्यूडोफेड्रिल नारळ आणि ड्राय फ्रूटच्या माध्यमातून न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला पाठवले गेले. विशेष म्हणजे, त्याचे द्रमुक पक्षाशीही संबंध असल्याचे समोर आले आहे. चौकशीदरम्यान जफरने सांगितले की, त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाला 45 पार्सल पाठवले आहेत. या ड्रग्जच्या पुरवठ्यासाठी तो प्रतिकिलो एक लाख रुपये घेत असे. आतापर्यंत त्याने 3500 किलो स्यूडोफेड्रिल पाठवले आहे. म्हणजेच सुमारे 4 हजार कोटी रुपयांचा पुरवठा झाला आहे.

उदयनिधी स्टॅलिन यांना सात लाख रुपये दिले

जफर सादिकचे चेन्नईतही हॉटेल आहे. 2019 मध्ये ड्रग्जच्या तस्करीत त्याचे नाव मुंबई कस्टम्ससमोर आले होते. स्यूडोफेड्रिल नावाच्या या ड्रग्जची किंमत 1.5 कोटी रुपये प्रति किलो आहे. या सिंडिकेटमध्ये तमिळ आणि बॉलीवूडशी संबंधित काही लोकांचीही नावे समोर आली आहेत. जफर सादिकने सांगितले की, त्याने द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांना 7 लाख रुपये दिले आहेत. पूरग्रस्तांच्या मदतनिधीला 5 लाख तर पक्षनिधीला 2 लाख दिले. हा पैसा कोणत्या उद्देशाने दिला गेला आणि स्टॅलिन यांना ड्रग्जसाठी पैसे दिले गेले का, याचा तपास सुरु आहे.

ड्रग्जच्या पैशातून बनवलेला चित्रपट

एवढेच नांही तर कास्टिंग काउचचा कोनही या तपासात समोर आला आहे. मनी लाँड्रिंगचा तपास करण्यासाठी एनसीबी ईडीला पत्र लिहित आहे. एनसीबी लवकरच काही बॉलीवूड फिल्म फायनान्सर्सं,ना समन्स बजावणार आहे आणि त्यांना चौकशीसाठी बोलावणार आहे. याशिवाय, एनसीबी उदयनिधी स्टॅलिन यांनाही चौकशीसाठी बोलावू शकते. ड्रग्ज किंगपिन जफर सादिकचा 'मंगाई' नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार होता. एनसीबीच्या चौकशीत 'मंगाई' नावाचा तमिळ चित्रपट ड्रग्जच्या पैशातून बनवण्यात आल्याचे समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT