Saif Ali Khan Stabbed  Dainik Gomantak
देश

Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवर हल्ला; चाकूनं 6 वेळा भोसकलं, मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Saif li khan latest news: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूनं हल्ला करण्यात आल्याची माहिता समोर आलीय. हा हल्ला त्याच्या घरी झाला.

Sameer Amunekar

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूनं हल्ला करण्यात आल्याची माहिता समोर आलीय. हा हल्ला त्याच्या घरी झाला. सैफ वर सध्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या याप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत.

सैफ अली खान याच्या घरात घुसून एका अज्ञाताने हा हल्ला केल्याचे म्हटले जाते. चोरी करण्याच्या उद्देशानं घरात घुसलेला चोर हे मोलकरणीशी भांडत होता. त्यावेळी तिथे सैफ पोहोचला आणि मोलकरणीला वाचवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्याच्यावर चाकूनं वार करण्यात आले.

या हल्ल्यानंतर केवळ चाहतेच नाही, तर सेलिब्रिटींनाही मोठा धक्का बसला आहे. याप्रकाराबद्दल अभिनेत्री पूजा भट्टनं प्रतिक्रिया दिली. "आम्ही आता सुरक्षित नाही", असं त्या म्हणाल्या आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनूसार, "सैफ अली खानवर त्याच्या घरी एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. त्याच्या शरिरावर चाकू सारख्या धारदार शस्त्राने केलेल्या सहा जखमा आढळून आढळून आल्या आहेत. त्यातील दोन जखमा खोलवर आहेत.

एक जखम त्याच्या मणक्याजवळ झाली आहे. त्यांच्यावर सध्या कन्सल्टंट न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे, कन्सल्टंट प्लास्टिक सर्जन डॉ. लीना जैन, कन्सल्टंट अ‍ॅनेस्थेसियोलॉजिस्ट डॉ. निशा गांधी, इंटेन्सिव्हिस्ट डॉ. कविता श्रीनिवास, कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट डॉ. मनोज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत. शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किती दुखापत झाले आहे हे समजून येईल.”

सैफने 1993 साली प्रदर्शित झालेल्या "परंपरा" या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सुरुवातीच्या काळात त्याचे अनेक चित्रपट विशेष यशस्वी ठरले नाहीत, पण 1994 साली आलेल्या "मैं खिलाड़ी तू अनाड़ी" आणि "ये दिल्लगी" या चित्रपटांनी त्याला लोकप्रियता मिळवून दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; 'त्या' भावी नगरसेवकांना हवाय युरीचा आशीर्वाद!

Goa Live News: गोव्याच्या डॉ. अंजनेय कामतची भरारी! NEET-PG 2025 मध्ये राज्याचा प्रथम क्रमांक

IFFI Goa 2025: इफ्फीच्या उद्‍घाटनाच्या चित्रपटाचे सिनेकर्मींना आमंत्रण का नाही? 'फिल्म मेकर्स'चा सवाल; मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

Goa Crime: दक्षिण गोव्‍यात सात दिवसांत चार अल्‍पवयीनांची अपहरणे, एका प्रकरणाचा छडा; तीन तपासाविना प्रलंबित

Education: भारतीय विद्यार्थ्यांचा कल करिअर केंद्रित शिक्षणाकडे, लंडनमधील विद्यापीठाचा परदेशातील शिक्षणाबाबत अहवाल

SCROLL FOR NEXT