Boiler blast in Haryana Dainik Gomantak
देश

Boiler blast in Haryana: हरियाणातील लाईफ लाँग कारखान्यात बॉयलरचा स्फोट, 50 हून अधिक कर्मचारी भाजले

Boiler blast in Haryana: ऑटो स्पेअर पार्ट्स बनवण्याचे काम करत होते कर्मचारी

Ganeshprasad Gogate

Boiler blast in Haryana: हरियाणातील रेवाडी येथील एका कंपनीत शनिवारी सायंकाळी बॉयलरचा स्फोट होऊन सुमारे 40 कर्मचारी गंभीररीत्या भाजले असून त्यांना रेवाडी शहरातील ट्रॉमा सेंटरमध्ये आणण्यात आले आहे.

द ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, ‘ धारुहेरा औद्योगिक परिसरात असलेल्या ऑटो पार्ट्स बनवणाऱ्या लाईफ लाँग फॅक्टरीत हा अपघात झाला. सायंकाळी सातच्या सुमारास कर्मचारी नेहमीप्रमाणे काम करत होते. अचानक बॉयलरचा मोठा आवाज होऊन स्फोट झाला.

सिव्हिल सर्जन सुरेंद्र यादव यांनी सांगितले की, कर्मचारी भाजलेले आहेत. काहींना धारुहेरा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेत काहीजणांचा मृत्यू झाल्याचे देखील सांगण्यात येतेय.

रेवाडी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 23 कर्मचारी दाखल आहेत. एका गंभीर रुग्णाला रोहतक पीजीआयमध्ये पाठवण्यात आले आहे.

कारखान्यात स्फोट झाल्याची माहिती मिळताच अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत. याशिवाय अग्निशमन दलाच्या गाड्यांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.

घटनास्थळावरून जळालेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढून ट्रॉमा सेंटर आणि इतर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. कर्मचारी इतके भाजले होते की त्यांना स्ट्रेचरवर झोपता येत नसल्याचे सांगण्यात आले आहे.

हा अपघात नेमका कसा घडला याविषयी कोणतीही माहिती प्राप्त झाली नसून या घटनेविषयी सविस्तर माहिती मिळवत आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tisk-Usgao Accident: मध्यरात्री 'नेस्ले कंपनीच्या' समोर दुचाकी आणि कंटेनरचा भीषण अपघात; मागे बसलेला युवक जखमी

Honda IDC: अनेकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी बनलेली सत्तरीतील 'ती औद्योगिक वसाहत पडलीये ओसाड

Chitrasangam 2024: प्रतिभावंतांचा कलाबहर! 'चित्रसंगम'मध्ये 17 चित्रकारांच्या कलाकृती

12th Fail अभिनेत्याकडे नव्हते गोव्यात हॉटेलचे बिल द्यायला पैसे, मुंबईच्या तिकिटासाठी विकला मोबईल; विक्रांतने सांगितला किस्सा

कलारंगाची उधळण करणारा Colors of Resilience! दिव्यांगांसाठी नवीन अध्यायाची सुरुवात..

SCROLL FOR NEXT