Prayagraj Crime Dainik Gomantak
देश

Video: प्रयागराजच्या रस्त्यावर दिवसाढवळ्या गोळीबार, उमेश पाल यांची हत्या करणाऱ्या...

Crime News: प्रयागराजमधून एक धक्कायदायक बातमी समोर येत आहे. उमेश पाल यांची हत्या करणाऱ्या शूटर्सच्या शोधात शुक्रवारी रात्री नाकाबंदी करण्यात आली होती.

Manish Jadhav

Prayagraj: प्रयागराजमधून एक धक्कायदायक बातमी समोर येत आहे. उमेश पाल यांची हत्या करणाऱ्या शूटर्सच्या शोधात शुक्रवारी रात्री नाकाबंदी करण्यात आली. जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या. प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे.

ज्या प्रकारे गोळीबार करणाऱ्यांनी उघड्या चेहऱ्याने ही घटना घडवली, त्यामुळे बाहेरील शूटर्संनी ही घटना घडवली असावी, असा संशय पोलिसांना आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या त्यांच्या चेहऱ्याच्या आधारे शोध घेतला जात आहे.

दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी धूमनगंजमध्ये ज्या सनसनाटी पद्धतीने शूटर्संनी उमेश पाल यांची हत्या केली, त्यामुळे पोलीस (Police) विभाग हादरला आहे. गोळीबार करणाऱ्यांनी तोंडही झाकले नव्हते. एकाने टोपी घातली होती. सर्वजण उमेशच्या क्रेटा कारची वाट पाहत होते. गाडी थांबताच उमेश बाहेर आले, एका शूटरने त्यांच्यावर गोळी झाडली.

यानंतर गोळीबार सुरु झाला. घटनेनंतर शूटर्स काही अंतरावर पायी पळून गेले आणि नंतर दुचाकीवर बसून तेथून पसार झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये शूटर्सचे चेहरे दिसत आहेत.

दुसरीकडे, त्यांची ओळख पटवण्यासाठी शहरात बराच काळ तैनात असलेल्या पोलिसांव्यतिरिक्त जुन्या चोरट्यांची मदत घेण्यात आली, मात्र त्यांची ओळख पटू शकली नाही. त्यामुळे चोरटे बाहेरचे असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे.

घटनेनंतर नक्कीच ते पळून गेले. यासाठी पोलिसांनी जिल्ह्याच्या सर्व सीमा सील केल्या. बाहेर जाणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी केली जात आहे.

पोलिसांचे पथक हॉटेल (Hotel), ढाबे, धर्मशाळांचीही तपासणी करत आहेत. जिल्ह्यातील सर्व स्थानके आणि बसस्थानकांवर सीसीटीव्ही फुटेज पाठवून तपास करण्यात येत आहे.

पूर्वांचलच्या शूटर्सवर संशय, डझनहून अधिक जिल्ह्यांना पाठवलेले फोटो

गोळीबार करणारा हा पूर्वांचलचा असावा असा पोलिसांना संशय आहे. या कारणास्तव, गोळीबार करणाऱ्यांचे फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज पूर्वांचलमधील डझनहून अधिक जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT