Blast in Crackers Factory in Madurai Dainik Gomantak
देश

Cracker Factory Explosion: मदुराईत फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; 5 मजुरांचा भयानक मृत्यू

दहा जण गंभीर जखमी

गोमन्तक डिजिटल टीम

Cracker Factory Explosion: तामिळनाडुच्या मदुराई जिल्ह्यात उसिलांबट्टी येथे गुरूवारी एका फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे कारखान्याला आग लागली. या दुर्घटनेत 5 मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना राजाजी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा स्फोट इतका मोठा होता की, कारखान्यात काम करत असलेल्या 5 मजुरांच्या शरीराच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या. अम्मा वासी, वल्लारासू, गोपी, विकी आणि प्रेमा अशी मृतांची नावे आहेत. या स्फोटाची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी पोहचली. स्फोटाचे नेमके कारण काय हे अद्याप कळलेले नाही.

प्रशासनाने स्थानिक लोकांची मदत घेत जखमींना रूग्णालयात दाखल केले. तसेच या आगीत अडकलेल्या इतरांना बाहेर काढले. या इमारतीत बिल्डिंगमध्य फटाक्यांच्या गोदामासह काही भाडेकरूही राहतात.

दरम्यान, गेल्या महिन्यातच मध्यप्रदेशात मुरैना येथे एका फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होऊन त्यात चार जणांचा मृत्यू झाला होता. तर सात जण जखमी झाले होते.तर सप्टेंबरमध्ये तामिळनाडुत कुड्डालोर जिल्ह्यात एका फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात सात मजुरांचा मृत्यू झाला होता. तर अनेक मजुर जखमी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT