Varun Gandhi Dainik Gomantak
देश

"हर कदम पर साथ खड़ा हूं..": या भाजप खासदाराने आंदोलकांच्या बाजूने केले ट्वीट

सैन्य भरतीसाठी केंद्र सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरु आहेत.

दैनिक गोमन्तक

Agnipath Scheme Protest: सैन्य भरतीसाठी केंद्र सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरु आहेत. बिहार आणि उत्तर प्रदेशात प्रचंड निदर्शने झाली. बिहारमध्ये आंदोलकांनी ट्रेनचे डबे पेटवून रास्ता रोको केला. भाजप कार्यालयाची तोडफोड करण्याबरोबरच संतप्त तरुणांनी राज्यातील काही भाजप नेत्यांच्या घरांवरही हल्ले केले आहेत.

दरम्यान, यूपीमध्येही राष्ट्रीय महामार्ग रोखण्यासोबतच जाळपोळीच्या घटनाही समोर आल्या आहेत. योजनेला विरोध करणाऱ्या तरुणांनी यमुना एक्स्प्रेस वेवर बस उलटवली. देशभरात सुरु असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) केंद्र सरकारच्या योजनेला विरोध करणाऱ्या लष्करी उमेदवारांच्या बाजूने उघडपणे मैदानात उतरले आहेत. काही काळापासून भाजप नेतृत्वावर नाराज असलेल्या वरुण गांधींनी शुक्रवारी एका ट्विटमध्ये विद्यार्थ्यांना (Students) या संघर्षात प्रत्येक टप्प्यावर सोबत राहण्याची ग्वाही दिली.

वरुण गांधी यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "मी या संघर्षात प्रत्येक टप्प्यावर लष्करी उमेदवारांच्या पाठीशी उभा आहे. तुम्हा सर्वांना विनंती आहे की, संयम बाळगा आणि 'लोकशाही प्रतिष्ठा' जपत विविध माध्यमातून सरकारला आपले निवेदन पाठवा. एक 'सुरक्षित' भविष्य' हा प्रत्येक तरुणाचा हक्क आहे! न्यायाचा विजय होईल.''

विशेष म्हणजे, वरुण गांधी यांनी गुरुवारी म्हटले होते की, 'अग्निपथ योजनेमुळे तरुणांमध्ये अधिक असंतोष निर्माण होईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांना लिहिलेल्या पत्रात वरुण यांनी या योजनेशी संबंधित धोरणात्मक तथ्ये सरकारने समोर आणून आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली होती.'

गांधी पुढे म्हणाले की, 'या योजनेतील तरतुदींबाबत देशभरातील तरुणांनी अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या आहेत.' चार वर्षांच्या कालावधीनंतर निवृत्त होणाऱ्या सैनिकांचे काय होणार, असा सवालही वरुण यांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT