BJP MP Ranjeeta Koli Twitter
देश

Rajasthan: भाजप महिला खासदाराच्या गाडीवर खाण माफियांचा हल्ला!

राजस्थानच्या भरतपूरमध्ये भाजप खासदार रंजिता कोळी यांच्या गाडीवर खाण माफियांनी हल्ला केला. यानंतर खासदार धरणे धरत बसले आहेत.

दैनिक गोमन्तक

राजस्थानच्या भरतपूरमध्ये भाजप (BJP) खासदार रंजिता कोळी (Ranjeeta Koli) यांच्या कारवर खाण माफियांनी हल्ला केल्याची बातमी आहे. खासदार रंजिता कोळी या दिल्लीहून राजस्थानला परतत असताना भरतपूरमध्ये खाण माफियांनी (Mining Mafia) त्यांच्या कारवर दगडफेक केल्याचे बोलले जात आहे. हल्ल्यानंतर भाजपचे खासदार धरणावर बसले आहेत. (Ranjeeta Koli Car Attacked By Mining Mafia News)

हल्ल्याबाबत रंजीता कोळी म्हणाल्या, "मी सुमारे 150 ओव्हरलोड ट्रक पाहिले आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण तेथून त्यांनी पळ काढला. मीच गाडी आहे असे समजून त्यांनी दगडफेक सुरू केली, गाडीच्या काचा फोडल्या.

मला मारले जाईल हा माझ्यावर हल्ला आहे पण मी घाबरणार नाही.” भाजप खासदार म्हणाल्या, “त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. जीव वाचवण्यासाठी मी गाडीतून उडी मारली. आम्हाला फक्त अवैध खाणकाम थांबवायचे आहे, आज आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजप खासदारांनी ट्विट करून ही माहिती दिली

भाजप खासदार रंजिता कोली यांनी त्यांच्या अधिकृत हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये (Twitter) म्हटले आहे की, "भरतपूर लोकसभा मतदारसंघात अवैध खाण आणि खाण माफियांचे इतके वर्चस्व आहे की मी जेव्हा माहिती मिळताच कामणला पोहोचले तेव्हा रात्रीच्या अंधारात 100 हून अधिक संबंधित बेकायदेशीर उत्खनन वाहने घटनास्थळी आढळून आली आणि माझ्याकडून अडवल्याने आज पुन्हा एकदा माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला.

भरतपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली

भरतपूरचे जिल्हाधिकारी आलोक रंजन यांनी या प्रकरणाबाबत सांगितले की, "ओव्हरलोड ट्रकने त्यांच्यावर दगडफेक केल्याचा आरोप करत त्या धरण्यावर बसल्या आहेत. आम्ही घटनास्थळी येऊन त्यांना तक्रार देण्यास सांगितले, त्यांनी होकार दिला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्याने जवळच्या पोलिस चौक्यांकडून तातडीने मदत मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT