BJP MLA Maadal Virupakshappa’s home Dainik Gomantak
देश

Viral Video: 40 लाखांची लाच घेताना भाजप आमदाराच्या मुलाला अटक, घरात सापडले घबाड

आमदारांनाही चौकशीसाठी लोकायुक्त कार्यालयाकडून समन्स बजावले जाऊ शकते.

Pramod Yadav

कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये लोकायुक्तांच्या छाप्यात भाजप आमदाराच्या घरातून सुमारे सहा कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यापूर्वी लोकायुक्तांनी आमदार मदल विरुपक्षप्पा यांच्या मुलाला 40 लाखांची लाच घेताना अटक केली होती, त्यानंतर त्यांच्या कार्यालयावर आणि आमदार निवासावर छापा टाकला. यावेळी पथकाच्या हाती ही रोकड लागली.

लोकायुक्तांनी रात्री उशिरा टाकलेल्या छाप्यात भाजप आमदार मदल विरुपक्षप्पा यांच्या घरातून सहा कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. याशिवाय आमदार पुत्र प्रशांत मडाळ याच्या कार्यालयातून 1.7 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. आता आमदारांनाही चौकशीसाठी लोकायुक्त कार्यालयाकडून समन्स बजावले जाऊ शकते.

यापूर्वी लोकायुक्तांनी आमदार पुत्र प्रशांत मडाळ याला 40 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. भाजपचे आमदार मदल विरुपक्षप्पा हे कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट लिमिटेडचे ​​चेअरमनही होते, मात्र गदारोळानंतर विरुपक्षप्पा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांनी अद्याप आमदारपदाचा राजीनामा दिलेला नाही.

आमदार मुलाच्या कार्यालयातून 40 लाखांव्यतिरिक्त 1.7 कोटी रुपये लोकायुक्तांना सापडले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, लाच कदाचित इतर लोकांकडून घेतली गेली असावी. लोकायुक्तांनी प्रशांत मंडल याला लाच घेताना रंगेहात पकडले होते. भाजप आमदाराकडून सुमारे आठ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

याप्रकरणी आमदार पुत्र प्रशांत याच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचवेळी काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी कर्नाटक सरकारवर निशाणा साधला आहे.

"सरकारची 40 टक्के लूट सुरूच आहे. म्हैसूर चप्पल साबणाच्या सुगंधातही भ्रष्टाचार! 40 लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक आणि आता भाजप आमदाराच्या मुलाच्या घरातून 6 कोटींची रोकड जप्त. वडील अध्यक्ष आहेत तर, मुलगा पैसे घेतो."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli World Record: विराट कोहलीची अवघ्या 7 धावांची खेळी, पण रिकी पाँटिंगचा विश्वविक्रम मोडला! न्यूझीलंडविरुद्ध बनला नंबर 1 फलंदाज

VIDEO: डिचोलीत भीषण अपघात; जिममधून घरी परतताना दुचाकीवरील नियंत्रण सुटलं, 22 वर्षीय तन्मयचा उपचारादरम्यान मृत्यू

Goa Pollution Control Board: धारबांदोड्यातील हॉटमिक्स प्रकल्प सुरू करण्यास मनाई, उच्च न्यायालयाचा दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीला आव्हान

Women’s T20: श्रेया परबची नाबाद 52 धावांची झुंज व्यर्थ; महाराष्ट्राने गोव्याला 12 धावांनी नमवले

Viral Video: मोबाईल ठेवायला जागा नाही म्हणून थेट चाकू बाहेर काढला! ट्रेनमधील तरुणाच्या कृत्याने प्रवासी संतप्त, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT