MP minister controversy Dainik Gomantak
देश

Colonel Sofiya Qureshi:"मी मनापासून माफी मागतो" कर्नल कुरेशींवरील टिप्पणी मंत्री शहांना भोवली; सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार?

Colonel Sofiya controversy: उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दाखल झालेल्या एफआयआरपासून दिलासा मिळवण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना कठोर शब्दांत फटकारले.

Akshata Chhatre

MP minister Vijay Shah: मध्य प्रदेशचे आदिवासी कल्याण मंत्री विजय शहा यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दाखल झालेल्या एफआयआरपासून दिलासा मिळवण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना कठोर शब्दांत फटकारले.

शिष्टाचार पाळणे अपेक्षित

गुरुवारी (दि.१५) नवनियुक्त सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. शाह यांनी एफआयआरला स्थगिती देण्याची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी १६ मे रोजी ठेवली आहे.

सरन्यायाधीश गवई यांनी मंत्र्यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप नोंदवला. ते म्हणाले, "तुम्ही कोणत्या प्रकारचे वक्तव्य करत आहात? घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने शिष्टाचार पाळणे अपेक्षित आहे. जेव्हा देश गंभीर परिस्थितीतून जात असतो, तेव्हा प्रत्येक शब्द जबाबदारीने वापरला पाहिजे."

कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वतःहून घेतल्यानंतर, बुधवारी (दि.१४) रात्री उशिरा महूच्या मानपूर पोलीस ठाण्यात विजय शाह यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली होती. या एफआयआरला स्थगिती देण्यासाठी शाह यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र त्यांनी सार्वजनिकरित्या आपल्या वक्तव्याबद्दल माफीही मागितली आहे.

बुधवारी संध्याकाळी उशिरा शाह यांनी एक निवेदन जारी केले होते, ते म्हणाले की "मला माझ्या शब्दांबद्दल खूप दुःख आणि खेद वाटतोय. माझा हेतू सोफिया यांच्या योगदानाला आदराने अधोरेखित करण्याचा होता, पण भावनिक तणावाच्या क्षणी मी चुकीचे बोलून गेलो. मला खरोखर लाज वाटते आणि मी मनापासून माफी मागतो."

१२ मे रोजी इंदूर जिल्ह्यातील मानपूर येथे आयोजित कार्यक्रमात मंत्री विजय शाह यांनी भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे देशभरातून संताप व्यक्त केला गेला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात धर्मांतरविरोधी कठोर कायदा करा; हिंदू राष्ट्र समन्वय समितीची मागणी

Government Employees: वृद्ध पालकांच्या देखभालीसाठी सरकारी कर्मचारी घेऊ शकतात 30 दिवसांची रजा, केंद्रीय मंत्र्यांनी राज्यसभेत स्पष्टच सांगितलं

Viral Video: नवा जुगाड, नवा व्हिडिओ! सोशल मीडियावर धुमाकूळ, तुम्हीही म्हणाल, 'क्या बात है!'

'म्हादई आमची लढाई, आमचे आम्हाला मिळत नाही तोवर विश्रांती नाही'; प्रमोद सावंत यांच्या वक्तव्यानंतर DK शिवकुमारांचा इशारा

August 2025 Horoscope: मेष ते मीन... ऑगस्टमध्ये 'या' 5 राशींच्या कुंडलीत अशुभ योग, खर्च आणि तणावात वाढ!

SCROLL FOR NEXT