August 2025 Horoscope: मेष ते मीन... ऑगस्टमध्ये 'या' 5 राशींच्या कुंडलीत अशुभ योग, खर्च आणि तणावात वाढ!

Zodiac Signs Challenges: ऑगस्ट महिना ग्रह-नक्षत्रांच्या मोठ्या बदलांचा साक्षीदार ठरणार आहे. या महिन्यात सूर्याचे सिंह राशीत गोचर होईल, जिथे सूर्य स्वतःच्या राशीत राहील.
Zodiac Signs Challenges
August 2025 HoroscopeDainik Gomantak
Published on
Updated on

August 2025 Horoscope: ऑगस्ट महिना ग्रह-नक्षत्रांच्या मोठ्या बदलांचा साक्षीदार ठरणार आहे. या महिन्यात सूर्याचे सिंह राशीत गोचर होईल, जिथे सूर्य स्वतःच्या राशीत राहील, परंतु याच ठिकाणी केतूही सूर्यासोबत असल्यामुळे 'ग्रहण योग' निर्माण होईल. तसेच, मंगळ कन्या राशीत गोचर करुन शनीसोबत समसप्तक योग साधेल. याव्यतिरिक्त, राहू कुंभ राशीत बसून सूर्यासोबत समसप्तक योग आणि मंगळासोबत षडाष्टक योग तयार करेल.

दरम्यान, या ग्रहस्थितीमुळे ऑगस्ट महिन्यात 5 राशींच्या व्यक्तींना कौटुंबिक जीवनात अडचणी, आर्थिक नुकसान आणि आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. चला तर मग जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यात कोणत्या राशींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Zodiac Signs Challenges
Shravan Horoscope: श्रावणापूर्वीच होणार 'शिवाची कृपा'! गजकेसरी आणि मालव्य राजयोग; वृषभ, मिथुन, कर्क, वृश्चिक राशींना धनलाभ आणि सुखसमृद्धी

1. मेष (Aries) - कौटुंबिक जीवनात समस्या

मेष राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना फारसा चांगला नसेल. या महिन्यात तुमच्या जीवनात बरीच उलथापालथ होण्याची शक्यता आहे. प्रवासाचे नियोजन बिघडू शकते. तसेच, कामाच्या ठिकाणी आणि कौटुंबिक जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. अशा परिस्थितीत, शांत राहून संयमाने समस्यांचे निराकरण शोधण्याचा प्रयत्न करा. नोकरदारांना टीम प्रोजेक्ट मिळू शकतो, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास (Confidence) वाढू शकतो. तसेच, आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा आणि खर्चांवर नियंत्रण ठेवा. आरोग्याच्या दृष्टीने पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. जास्त वेळ बसून काम करणे टाळा.

2. वृषभ (Taurus) - भावनिक चढ-उतार

वृषभ राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना भावनिक स्तरावर बरेच चढ-उतार घेऊन येणार आहे. तुमचे वैयक्तिक आयुष्य थोडे विस्कळीत राहील, ज्यामुळे तुम्ही भावनिकदृष्ट्या थोडे कमजोर राहाल. तसेच, तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण होईल. एखादी जुनी व्यक्ती तुमच्या आयुष्यात परत येऊ इच्छित असेल, पण तुम्ही भावनिकदृष्ट्या तयार झाल्यावरच त्यांना परत घेण्याचा विचार करा. या महिन्यात तुमचे खर्च खूप वाढतील, कारण तुम्ही चैनीच्या वस्तूंवर जास्त पैसे खर्च कराल. आरोग्याच्या (Health) दृष्टीने त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

Zodiac Signs Challenges
Love Horoscope: विवाह निश्चित होण्याचे संकेत, नवीन नातं सुरू होण्याची चाहूल; वाचा काय सांगतंय तुमच्या राशीचं भविष्य?

3. कन्या (Virgo) - अनेक अडचणींचा सामना

कन्या राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना अनेक अडचणी घेऊन येईल. कामाच्या संदर्भात नियोजित प्रवास रद्द होऊ शकतात. या काळात धैर्य ठेवा आणि शक्य तितका वेळ कुटुंबासोबत घालवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. नोकरदार लोकांसाठी हा महिना खास नसेल, कारण अपेक्षित प्रमोशन मिळणार नाही. आपले कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास, अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे कोणालाही पैसे उधार देऊ नका. आरोग्याच्या बाबतीत बीपी (Blood Pressure) इत्यादी समस्यांचा त्रास होऊ शकतो, म्हणून आहाराची काळजी घ्या.

4. वृश्चिक (Scorpio) - आरोग्यामुळे त्रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना फारसा चांगला नसेल. या महिन्यात तुमच्या वैवाहिक जीवनात अनेक समस्या निर्माण होतील. विवाहित लोकांनी मोकळेपणाने संवाद साधावा आणि स्वतःला शांत होण्यासाठी वेळ द्यावा. तसेच, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात कामाचा ताण अधिक राहील. स्वतःच्या मर्यादा निश्चित करा आणि वेळेचे व्यवस्थापन करा. या काळात तुम्हाला खूप प्रवास करावा लागू शकतो, ज्यामुळे खर्चही वाढतील. यासाठी आपत्कालीन निधीचा (Emergency Fund) वापर करा, पण गरजेपेक्षा जास्त खर्च करणे टाळा, अन्यथा भविष्यात अडचणी येऊ शकतात. आरोग्याच्या बाबतीत कोणतीही मोठी समस्या दिसत नसली तरी, डोकेदुखीचा (Headache) त्रास होऊ शकतो.

Zodiac Signs Challenges
Horoscope: गुरु ग्रहाची युवावस्था 'या' 3 राशींना देणार बंपर लाभ; धनवर्षाव ते विवाहयोग, गुरुपौर्णिमेच्या दिवशी नशीब चमकणार

5. मीन (Pisces) - जीवनात वाढणार अडचणी

मीन राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना थोडा कठीण असेल. या महिन्यात कामाच्या ठिकाणी आणि कौटुंबिक जीवनात तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. संयम बाळगा आणि कामाच्या ठिकाणी सर्वांसोबत मिळून काम करा. तुमच्या उत्पन्नाच्या बाबतीत महिना हळूहळू पुढे सरकेल. कार्यालयातील काम करणे थोडे अवघड वाटू शकते, अशावेळी आपला 'अहं' बाजूला ठेवून लोकांशी मदत मागण्यास संकोच करु नका. या महिन्यात तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्यांचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे त्वचेची अधिक काळजी घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com