त्रिपुरा नागरी निवडणुका  Dainik Gomantak
देश

त्रिपुरा नागरी निवडणुकीत भाजप आघाडीवर तर TMC दुसऱ्या क्रमांकावर

एकूण 222 जागांवर 785 उमेदवार उभे राहिले होते. त्यापैकी 36 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज कडून घेतले होते.

दैनिक गोमन्तक

त्रिपुरामध्ये (Tripura) 14 नगरपालिकांच्या निवडणुकीचे (elections) निकाल आज जाहीर झाले आहेत. भाजप इतर पक्षांना क्लीनबोल्ट करत आहे. भाजपाच्या 8 जागांचा विजय झाला आहे. गुरुवारी 20 पैकी 14 नगरपालिका (Municipality) संस्थांसाठी मतदान पार पडले. भाजपने सर्व जागांवर उमेदवार होते. एकूण 334 जागांपैकी 112 जागा भाजपने बिनविरोध करून जिंकल्या आहेत. उर्वरित महानगरपालिका व नगर पंचायत निवडणुकीतील एकूण 222 जागांसाठी मतदान झाले.

राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) माहितीनुसार, अंबासा, जिरानिया, तेलियामुरा आणि सबरूमवर भाजप पुढे आहे. 2018 मध्ये सत्तेवर आल्यानंतर भाजप त्रिपुरामध्ये नागरी निवडणुका लढवत आहे. आगरतळा महानगरपालिकेच्या (AMC) सर्व प्रभागांमध्ये तृणमूल काँग्रेस (TMC) दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 12 वाजेपर्यंत भाजपला एएमसी भागात 58,821 मते मिळाली आहेत, तर टीएमसीला 22,295 मते मिळाली आहेत. तर सीपीआय(एम) 15,960 मतांसह तो पक्ष तिसऱ्या नंबर वरती आहे.

CPI मागे

तीन डावे पक्ष - CPI , फॉरवर्ड ब्लॉक आणि RSP- CPI यांच्या सोबत युती करून एकूण 2,650 मते मिळविली आहेत. मात्र, माकप भाजपच्या मागे आहे. आगरतळा व्यतिरिक्त, टीएमसीने दुसरे स्थानावर आहेत. तीन शहरी संस्थांमध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या नेतृत्वाखालील पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच, सहा नगरपालिका संस्थांमध्ये काँग्रेस तिसऱ्या स्थानावर आहे. या 222 जागांवर 785 उमेदवार उभे राहिले होते. त्यापैकी 36 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज कडून घेतले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT