BJP leader and MP Subramanian Swamy attacks on BJP government  Dainik Gomantak
देश

मोदी सरकार हे मूर्ख लोकांनी भरलेलं,भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांची स्वकीयांवरच जहरी टीका

खासदार सुब्रमण्यम स्वामी हे सोशल मीडियावर मोदी सरकारवर सातत्याने टीका करत असतात

दैनिक गोमन्तक

भारतीय जनता पक्षाचे (BJP) राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी गुरुवारी पुन्हा एकदा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर (Narendra Modi Government) जोरदार निशाणा साधला आहे. आपल्याच सरकारला प्रश्न विचारत स्वामी म्हणाले की, राज्यकारभाराच्या जवळपास सर्वच बाबतीत सरकार अपयशी ठरले आहे.तर दुसरीकडे कालच सुब्रमण्यम स्वामी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची भेट घेतली होती आणि त्यांच्या या भेटीनंतरच सुब्रमण्यम स्वामी यांचं हे विधान आल्याने राजकीय क्षेत्रात साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. (BJP leader and MP Subramanian Swamy attacks on BJP government)

भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, मोदी सरकार अर्थव्यवस्था, सीमा सुरक्षा, परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षा या साऱ्या मुद्द्यांवर अपयशी ठरले आहे. अफगाणिस्तानच्या संकटाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारच्या भूमिकेलाही त्यांनी ‘अपयश’ म्हटले. एवढेच नाही तर पेगासस डेटा सिक्युरिटी भंगासाठी त्यांनी केंद्राला जबाबदार धरले आहे . अंतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, सध्याच्या सरकारच्या काळात काश्मीरची "दुःखी" स्थिती आहे. या अपयशाला जबाबदार कोण, असा थेट सवाल त्यांनी केला आहे.

तत्पूर्वी बुधवारी, सुब्रमण्यम स्वामी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आणि त्यांची जोरदार प्रशंसा केली आणि जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, राजीव गांधी, चंद्रशेखर आणि पीव्ही नरसिंह राव यांसारख्या राजकीय दिग्गजांशी त्यांची तुलना केली. या लोकांच्या बोलण्यात आणि वागण्यात काहीही फरक नसल्याचं त्यांनी ट्विट केलं आहे. भारतीय राजकारणातील हा दुर्मिळ गुण असल्याचे देखील सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हण्टलं आहे.

खासदार सुब्रमण्यम स्वामी हे सोशल मीडियावर मोदी सरकारवर सातत्याने टीका करत असतात . त्यांनी 23 नोव्हेंबर रोजीच एक ट्विट करत , "जर चीन आमच्या अण्वस्त्रांना घाबरत नाही तर आम्ही त्यांच्या अण्वस्त्रांना का घाबरतो?". एका दिवसापूर्वी, त्यांनी एका ट्विटर वापरकर्त्याच्या भाववाढीवर केलेल्या टिप्पणीला उत्तर दिले की, "त्यांना (पीएम नरेंद्र मोदी) अर्थशास्त्र माहित नाही."अशी जहरी टीका केली होती.

त्याचबरोबर त्यांनी मोदी सरकार मूर्ख लोकांनी भरले आहे अशा आशयाचं देखील एक ट्विट केलं होत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT